चिनावल सरपंच भावना योगेश बोरोले याना खानदेश रणरागिनी पुरस्कार
Monday To Monday NewsNetwork।
चिनावल ता.रावेर(प्रतिनिधी)। केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली शाखा जळगावच्या वतीने ८ मार्च महिला दिनाच्या निमित्ताने जळगाव, धुळे, नंदुरबार या खानदेशातील शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, आरोग्य, आणि कला, राजकारण अशा विविध क्षेत्रामध्ये ज्या महिला सक्षम काम करत आहेत समाजाची सेवा करत आहेत अशा ३५ महिलांची निवड जळगाव जिल्हा कार्यकारिणीने करून नाशिक विभागाच्या आयुक्त श्रीमती संगीता धायगुडे मॅडम यांनी झुम मीटिंग द्वारे हे खानदेश रणरागिनी पुरस्कार मागील महिन्यात जाहीर केले होते त्या पुरस्काराचं वितरण जळगाव जिल्हा व जळगाव तालुक्याच्या वतीने जळगाव येथे नुकतेच करण्यात आले तसेच आज दिनांक २० जून २०२१ रोज रविवारला राष्ट्रीय संघटन सचिव श्री शिवचरण उज्जैनकर यांच्या निवासस्थानी चिनावल, तालुका-रावेर येथील सरपंच सौ भावनाताई योगेश बोरोले याना प्रदान करण्यात आला.
तसेच के-हाळे तालुका रावेर येथील पोलीस पाटील श्रीमती वर्षाताई पाटील, वडोदे तालुका मुक्ताईनगर येथील प्राथमिक शिक्षिका श्रीमती शालिनीताई दिगंबर सोमकुंवर मॅडम व श्रीमती संजीवनीताई ढगे यांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल खानदेश रणरागिनी पुरस्काराने नुकतेच7 केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय संघटन सचिव श्री शिवचरण उज्जैनकर सर व त्यांच्या पत्नी सौ. संगीता उज्जैनकर जळगाव जिल्हा महासचिव श्री विनोदभाऊ पाटील जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष श्री राजूभाऊ सवळे जळगाव जिल्हा संघटन सचिव श्री मनोज लुल्हे सर मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष श्री विनायक वाडेकर सर, श्री योगेश बोरैले,उपक्रमशील शिक्षक श्री गणेश कोळी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या चार महिलांना खानदेश रणरागिनी पुरस्काराने गौरविण्यात आले यावेळी त्यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले यावेळी या कर्तृत्ववान महिलांनी प्रसंगी आपले मनोगत ही व्यक्त करून आपल्या कार्याची माहिती देऊन केंद्रीय मानवाधिकार संघटनेच्या या स्तुत्य उपक्रमाचे खूप कौतुक केले प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवचरण उज्जैनकर यांनी जळगाव जिल्हा अध्यक्ष डॉ. अजय पाटील जिल्हा उपाध्यक्षा श्रीमती साधनाताई लोखंडे जिल्हा सचिव राजकुमार कांकरिया सर सहसचिव डॉ. प्रवीण बडगुजर सर जळगाव तालुका अध्यक्ष श्री किशोर पाटील सर उपाध्यक्षा सौ. ज्योती ताई राणे यांचे खूप अभिनंदन केले तसेच या पुरस्कारासाठी सुंदर प्रमाणपत्र व आकर्षक स्मृतिचिन्ह सौ. ज्योतीताई राणे यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्याबद्दल उज्जैनकर यांनी त्यांचे आभार मानले प्रसंगी उज्जैनकर म्हणाले की पुरस्कार म्हणजे एक टॉनिक आहे ते मिळाल्यानंतर आपल्याला आपल्या कार्याची जाणीव होऊन भविष्यामध्ये आपल्या कार्याला द्विगुणीत करण्याचं बळ व ऊर्जा या पुरस्काराने प्राप्त होत असते प्रसंगी सर्व खानदेश रणरागिनी पुरस्कारार्थी यांचे उज्जैनकर यांनी अभिनंदन केले गेल्या पंधरा दिवसापूर्वी चार महिलांचाच पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला शासनाचे कोवीड-१९ चे याप्रसंगी काटेकोर पालन करण्यात आले बाकी महिलांना जळगाव येथील पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच हे पुरस्कार प्रदान करून गौरवलेले आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मनोज लुल्हे सर यांनी केले तर आभार मुक्ता नगर तालुका अध्यक्ष श्री विनायक वाडेकर सर यांनी मानले.