महाराष्ट्राच्या वेशीवर चिनी व्हायरस, खरतनाक HMPV ची भारतात एन्ट्री, सरकार अलर्ट मोडवर
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l कोविड -१९ नंतर चीनच्या HMPV विषाणून अखेर भारतात प्रवेश केला आहे. इतकंच नाही तर तो महाराष्ट्राच्या वेशीवर दाखल झाला आहे. गुजरात मध्ये एक तर कर्नाटक मध्ये दोन रुग्ण आढळले आहेत. एक वर्षही पूर्ण न झालेल्यांना ही लागण झाली असून या खरतनाक HMPV व्हायरस ने भारतात एन्ट्री केल्याने सरकार अलर्ट मोडवर आले आहे. महाराष्ट्रात अद्याप एकही रुग्ण नाही मात्र सरकार कडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चीनमधून आलेल्या या नवीन विषाणुमुळे चिंतेचे कारण नसले तरी, नागरिकांनी आवश्यक दक्षता घ्यावी. या प्रकरणी भितीचे वातावरण निर्माण करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
भारतात आठ महिन्यांच्या बाळाच्या रुपाने एचएमपीव्ही व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला आहे. या बाळाने कुठलाही प्रवास केलेला नाही.
भारतामध्ये एचएमपीव्हीचे रूग्ण समोर येत असताना आता चिंता वाढली असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना काळजी न करण्याचे आवाहन केले आहे. हा विषाणू नवा नाही पण आता पुन्हा त्याचा चंचूप्रवेश झाला आहे. याबाबत लवकरच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची सर्व राज्यातल्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक आहे. त्यानुसार लवकरच आवश्यक मार्गदर्शक तत्त्व जारी केली जातील असे त्यांनी म्हटले आहे.
एचएमपीव्ही या व्हायरसला घाबरण्याचं कारण नाही. प्राथमिक माहितीनुसार हा व्हायरस नवीन नाही, यापूर्वीही हा व्हायरस आला आहे. पुन्हा एकदा या व्हायरसचा चंचूप्रवेश होताना दिसतो आहे. यासंदर्भात जी नियमावली आहे ती जाहीर होईल. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने राज्यांना माहिती देण्याचे ठरवले आहे. या व्हायरसला घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. या संदर्भात कपोलकल्पित माहिती देऊ नका. जी अधिकृत माहिती येईल ती माहितीच द्यावी. असेही त्यांनी म्हटले आहे.
ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस असं या व्हायरसचं नाव आहे.
ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही) हा आरएनए विषाणू आहे, जो न्यूमोव्हिरिडे कुटुंबातील मेटाप्युमोव्हायरस वंशातील आहे.
ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही) सामान्य सर्दी आणि कोरोना व्हायरससारखी लक्षणे दर्शविते. त्यामध्ये खोकला, ताप व सर्दी यांसारख्या लक्षणांचा समावेश आहे.
२००१ मध्ये डच संशोधकांनी सर्वांत पहिल्यांदा याचा शोध लावला होता. हा विषाणू श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो. मुलांच्या नमुन्यांचा अभ्यास करताना या विषाणूचा शोध लागला होता. संशोधन असे सूचित करते की, हा विषाणू किमान सहा दशकांपासून प्रसारित आहे आणि आता जागतिक स्तरावर प्रचलित श्वसन रोगजनक म्हणून ओळखला जातो. एचएमपीव्ही प्रामुख्याने खोकताना आणि शिंकताना बाहेर काढलेल्या श्वसनाच्या थेंबांद्वारे पसरतो. संक्रमित व्यक्तींच्या जवळच्या संपर्कातून किंवा दूषित वातावरणाच्या संपर्कातूनदेखील या विषाणूचे संक्रमण होऊ शकते. चीनी सीडीडी वेबसाइट सांगते की, एचएमपीव्ही’साठी संसर्ग कालावधी तीन ते पाच दिवसांचा असतो. हा विषाणू हिवाळा आणि वसंत ऋतूच्या महिन्यांत जास्त प्रमाणात आढळतो. HMPV हा विषाणू फारसा धोकादायक नाही असं चीन सरकार कडून स्पष्टीकरण करण्यात आलं आहे.
भारत सरकारने नॅशनल सेंटर फॉर डिसिज कंट्रोल निगराणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय जागतिक आरोग्य संघटनेलाही ताजी माहिती देत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आपण या नव्या व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहोत, असंही सरकारने स्पष्ट केलंआहे.
HMPV व्हायरसचे लक्षण
कोरोना सारखे लक्षण
ताप आणि खोकला
श्वास घ्यायला त्रास
फुफ्फुसात संक्रमण
नाक बंद होणं
गळ्यात घरघर होणं
संसर्गजन्य रोग, संपर्कात आल्याने फैलावतो
हे करा
जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.
साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.
ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
– भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा.
– संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्या.
हे करू नये
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कराहस्तांदोलन
टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर
आजारी लोकांशी जवळचा संपर्क
डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे,
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) पेणे