२८ वर्षीय विवाहितेचा विनयभंग
चोपडा,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। चोपडा तालुक्यातील एका २८ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.या बाबत जितेंद्र अशोक सोनार याचे विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जितेंद्र अशोक सोनार याने २२ मे २०२२ सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास २८ वर्षीय विवाहित महिला घरात एकटी असल्याचा फायदा घेत तिच्या घरात घुसून तिला ओढाताण करत अश्लील शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला.या बाबत महिलेने तक्रार दिल्याने चोपडा पोलिसस्टेशनला
जितेंद्र अशोक सोनार,रा. पिंप्राळा, जळगाव, याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.