अल्पवयीन मुलीचे बस स्थानकातून अपहरण करून अत्याचार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
चोपडा,मंडे टू मंडे वृत्तसेवा। एका अल्पवयीन मुलीचे चोपडा बस स्थानकातून अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी धरणगावच्या एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक पाटील असे संशयित आरोपीचे नाव आहे.
यासंदर्भात अधिक असे की, १७ फेब्रुवारी २०२२ रोजी चोपडा बस स्थानक येथून दिपक हिरामण पाटील (रा. संजय नगर धरणगाव) याने लग्न करण्यासाठी पीडित मुलीला पळवून नेले होते. पिडीत मुलगी ही अल्पवयीन तसेच मागासवर्गीय असल्याचे माहित असतांना देखील पिडीत मुलीला पळवून घेवून गेला. तसेच विखरण ता. एंरडोल व किम ,बलासाड ( गुजरात )या ठिकाणी वेळावेळी अत्याचार केला. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात दिपक पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी भास्करराव डेरे करीत आहेत.