शासनाने दिलेल्या शेतजमिनीवर गांजाची शेती, ९८० किलो गांजा जप्त
चोपडा,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l शासनाने उपजीविकेसाठी दिलेल्या शेत जमीनिवर गांजाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यासह त्याच्या कडून ४४ लाख १० हजार रुपये किमतीचे ९८० किलो वजनाचे हिरवे गांजाचे झाडे जप्त करण्यात आले,ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी १२ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास केली असून अर्जुन सुमाऱ्या पावरा वय-४५ रा. मेलाणे ता. चोपडा याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेली माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील मेलाणे येथे राहणाऱ्या अर्जुन सुमाऱ्या पावरा याला शासनाने उपजीविकेसाठी शेत जमीन दिलेली होती. तो या शेतात मका लावून त्यात गांजाची पीक घेत असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने मंगळवारी १२ मार्च रोजी दुपारी ४ वाजता पथकासह पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४४ लाख १० हजार रुपये किमतीचे ९८० किलो वजनाचे गांजाची झाडे आढळून आले. दरम्यान पोलिसांनी ही सर्व झाडे उपटून जप्त केले आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अर्जुन सुमऱ्या पावरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन वरे हे करीत असून ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, वन विभागाचे अधिकारी कमल ढेकले, नायब तहसीलदार रवींद्र महाजन यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि अमोल मोरे, सहायक फौजदार युनूस शेख, पोहेकॉ सुनील दामोदरे संदीप पाटील, गोरख बागुल, नंदलाल पाटील, दर्शन ढाकणे, बबन पाटील, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल रजनी माळी, रूपाली खरे यांच्यासह पथकाने कारवाई केली आहे.