महीला अन्याय अत्याचार विरोधी समितीच्या चोपडा तालुका अध्यक्ष पदी कोमल पाटील तर जिल्हा सचिव पदी मन्सूर तडवी
चोपडा,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। महीला अन्याय अत्याचार विरोधी समितीची महाराष्ट्र राज्यांची येथे दिनांक २१/१/२०२४ रोजी जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे
बैठक संपन्न झाली या बैठकीत महीला अन्याय अत्याचार विरोधी समिती.महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष ऍड. कैलास शेळके व जिल्हाध्यक्ष जिवन तायडे (देवा भाऊ) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली
या वेळी महिला अन्याय अत्याचार विरोधी समिती च्या ध्येय धोरणाबाबत एड. कैलास शेळके, देवा भाऊ तायडे डीएस भालेराव, बबीता तडवी, सलीम पिंजारी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांची व चोपडा तालुक्याच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली, जळगाव जिल्हा सचिव पदी मन्सूर एस. तडवी यांची निवड करण्यात आली तसेच चोपडा तालुका अध्यक्ष पदी कोमल बापूराव पाटील, तालुका सचिव गुप्तार अरमान तडवी, तालुका उपाध्यक्ष शकीला मन्सूर तडवी, सहसचिव सपना प्रमोद साळुंखे, सहसचिव जरीना शेखर तडवी, सहसचिव रूपाली आढळके. पूजा विजय पाटील सहसचिव बेबाबाई अरुण पाटील , सचिव पदी अनिता जगदीश पाटील, उपाध्यक्ष नेहा बाबुराव पाटील तालुका युवती अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली.
या वेळी संस्थापक अध्यक्ष अड. कैलाश शेळके. जिल्हा अध्यक्ष जीवन तायडे (देवा भाऊ), जिल्हा उपाध्यक्ष सलीम पिंजारी,अनु जाती जिल्हाध्यक्ष डि.एस.भालेराव , जिल्हा उपाध्यक्ष जाकिर शेख उपाध्यक्ष अ, जा. विभाग विलास भालेराव,महिला यावल तालुका अध्यक्ष बबीता तडवी,यावल तालुका अध्यक्ष. पंकज कोळी, यावल तालुका उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, यावल तालुका कार्यकरनी प्रवीण हटकर, शोएब शेख,आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.