जळगाव जिल्ह्यात कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा,१० मालकीण महिला,५ दलाल व ६० तरुणी ताब्यात
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील नगरपालिकेच्या मागील परिसरात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने या सुरू असणाऱ्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईत तब्बल ६० जिल्ह्यासह परराज्यातील तरुणी ना ताब्यात घेतलं. या सोबत कुंटणखाना चालवणाऱ्या १० महिलांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की, चोपडा शहरातील नगर पालिकेच्या पाठीमागील परिसरातच अवैधरित्या कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या परिसरात पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, नेपाळमधील तरुणी वेश्या व्यवसायासाठी आणल्या जातात, अशीही माहिती मिळाली.त्यानंतर चोपडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, शहर पोलीस ठाण्यातील निरीक्षक मधुकर सावळे व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमालकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस पथकाने बुधवारी संध्यकाळी ६ वाजेच्या सुमारास कारवाई करत छापा टाकला. यात जिल्ह्यासह परराज्यातील ६० तरुणी आढळून आल्या. पोलिसांनी ५ दलाल तसेच कुंटणखाना चालवणाऱ्या १० महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.