लहान भावा कडून मोठ्या भावाचा धारदार विळ्याने खून ; असं काय कारण होतं! कारण वाचून बसेल धक्का!
चोपडा,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। लहान भावाने धारदार विळ्याने संदीप प्रताप पाटील या मोठ्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी चोपडा तालुक्यातील पारगाव शिवारात घडली.
मितावली येथील प्रताप मंगा पाटील हे पत्नी, दोन मुलांसह राहतात. त्यांच्याकडे १० एकर शेती आहे. त्यांची दोन्ही मुले एकत्रित शेती करतात. शनिवारी सकाळी संदीप पाटील वय ३६ व सतीश पाटील वय ३३ हे शेतात भेंडी तोडण्यासाठी गेले होते. तेथे दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी सतीश याने मोठा भाऊ संदीप याच्यावर धारदार विळ्याने वार करून त्याचा खून केला. गावापासून शेत दूर असल्याने घटना लवकर उघडकीस आली नाही. संशयित आरोपी शेतातच थांबून होता. अडावदचे एपीआय गणेश बुवा, फौजदार चंद्रकात पाटील, सहायक फौजदार सुनील तायडे, जयदीप राजपूत हे घटनास्थळी पोहचल्यानंतर संशयित आरोपी सतीश पाटील यास ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी जळगाव येथून ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते.
चोपडा तालुक्यातील मितावली येथे संदीप प्रताप पाटील आणि सतीश प्रताप पाटील हे दोन भाऊ वास्तव्याला होते. हे दोन्ही जण आपलील वडिलोपार्जीत शेती करून उदरनिर्वाह करत असत. दरम्यान, आज हे दोन्ही भाऊ आपल्या पारगाव शिवारात काम करण्यासाठी सोबत गेले होते दरम्यान दोघं भावांमध्ये जोरदार वाद झाल्याची माहिती मिळतं आहे.