भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमचोपडा

वाळूवाहतुक दारा कडून दहा हजाराची रंगेहात लाच स्वीकारताना तलाठ्यास अटक

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

चोपडा,जि जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। तापी नदीतून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई न करण्याच्या मोबादल्यात १० हजाराची लाच स्विकारणाऱ्या चोपडा तालुक्यातील देवगावच्या तलाठ्याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचुन रंगेहात पकडल्याने महसुल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

या बाबत अधिक वृत्त असे की, चोपडा तालुक्यातील तक्रारदार यांचे वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर असून ट्रॅक्टरवरती तापी नदीमधुन वाळू वाहतूक करू देणेसाठी व वाहनावर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे देवगाव येथील तलाठी भुषण विलास पाटील (वय-३२) रा. पंकज नगर चोपडा याने दर महिन्याला १० हजाराची मागणी केली. तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली असता आज चोपडा तहसील आवारात असतांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून तलाठ्यांच्या मागणीनुसार तक्रारदार यांनी पहिला हप्ता म्हणून १० हजार रूपये घेतांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे चोपडा तहसील कार्यालयात मोठी खळबळ उडाली.लाचलुचपत विभागाचे जिल्हा पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, स.फौ. सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील,पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ हे कारवाईत सहभागी होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!