ब्रेकिंग : विधानसभा निवडणुकी आधीच काँग्रेसच्या पाच आमदारांना दणका, पाचही आमदारांचे तिकीट कापले
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात विधान परिषद निवडणुक पार पडली. विधांनपरिषदेच्या ११ जगांसाठीच्या झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसचे काही आमदार फुटले. त्यांनी पक्षाचा व्हीप न पाळता महायुतीच्या उमेदवारांना मतदान केलं. या उमेदवारांवर कारवाई करावी करावी व पक्षाने या पाच उमेदवारांवर कारवाई केली आहे. या कारवाईला येत्या काही दिवसांत विधानसभेच्या निवडणुका असल्याने मोठे महत्व प्राप्त झाले आहे.
राज्यात विधान परिषद निवडणुक पार पडली. विधांन परिषदेच्या ११ जगांसाठीच्या झालेल्या निवडणुकीत १२ उमेदवार उभे होते. या निवडणुकीत काँग्रेसचे काही आमदार फुटले. त्यांनी क्रॉस ओट्टिग झाल्याचं समोर आले होते. ज्या आमदारांनी क्रॉस ओट्टींग् केलं होत त्या आमदारांवर हायकमांड कडून कारवाई होणार असे वृत्त समोर येत होत.त्या नुसार हायकमांड कडून ज्यांनी विधानसभेत क्रॉस ओट्टिंग् केलं त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली आहे. सुरुवातील हिरामण खोसकर या आमदराच नाव समोर येत होत मात्र खोसकर यांनी आधी पडताळणी करावी मग कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी हायकमांड कडे केली होती. त्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेवर सुद्धा टीका केली होती.
काँग्रेसच्या हायकमांड कडून त्या आमदारांवर कारवाई करण्यात आलेली आहे.या आमदारांवर त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे तिकीट न देण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. त्या पाचही आमदारांचे तिकीट पक्षाने कापले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना कांग्रेस पक्ष तिकीट देणार नाही.
कोण आहेत हे काँग्रेसचे आमदार
सुलभा खोडके, झिशान सिद्दीकी, हिरामण खोसकर, जितेश अंतापूरकर, व मोहन हंबर्डे या पाच आमदारांवर काँग्रेसच्या हायकमांड कडून कारवाई करण्यात आलेली आहे. यांचे मतदार संघ हे अमरावती, इगतपुरी,वांद्रे पूर्व,नांदेड दक्षिण , व देगलुर हे पाच मतदार संघ आहेत. या पाच आमदारांवर कारवाई करण्यात आलेली असून हे पाच आमदार आता पुढे काय पावलं उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.