भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

अन्न औषध प्रशासन अधिकारी असल्याचं सांगत ५० हजारांची खंडणी उकळली

यावल तालुक्यातील घटना

यावल, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l तुम्ही विमल गुटखा विकाताय असे म्हणत, तुम्हाला, तुमच्या पत्नीला व मुलाला अटक करून गुन्हा दाखल करण्यात येईल. असे सांगून अन्न औषध प्रशासन अधिकारी असल्याचं सांगत दोघांनी यावल तालुक्यातील चिंचोली येथील भवानी पेठ मध्ये असलेल्या संतोष बडगुजर या दुकानदारा कडून ५० हजाराची खंडणी घेतली.

आम्ही अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी आहोत. तुम्ही विमल गुटखा विक्री करता म्हणून तुमच्या विरुद्ध कारवाई करायची आहे . त्यात तुम्हाला,तुमच्या पत्नी व मुलाला अटक होईल. असा दम देत तुम्हाला अटक टाळायची असेल तर आम्हाला २ लाख रुपये द्या. शेवटी दुकानदाराने ५० हजार रुपये दिले असता दोघं तेथून निघून गेले. ही घटना ७ जुलै २०२४ ची आहे. परंतु ते दोघे पुन्हा ३० ऑगस्ट शुक्रवार २०२४ रोजी परत चिंचोली गावात येऊन त्याच दुकानदाराकडे पुन्हा पैशांची मागणी केली.परंतु त्या वेळी त्यांच्या दुकानात गुटखा नव्हता. पण दुकानदाराला संशय आल्याने दुकानदाराने या संदर्भात गावातीलच साळुंखे नामक होमगार्ड ला माहिती दिल्याने या बाबत यावल पोलिस स्टेशनला माहिती देण्यात आली.

लागलीच घटनास्थळी पो.निरीक्षक प्रदीप ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक सुनील मोरे, स. फौ. असलम खान,जकिर तडवी,वासुदेव मराठे,राहुल अहिरे या पथकाने दाखल होत आकाश भगवान जावरे,वय २९. आंबेडकर,नंदुरबार. व राहुल श्रीहरी काळे.वय ४३. राहणार – कात्रज, पुणे याना अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे सांगून खंडणी घेतल्या प्रकरणी दोघांना अटक करून यावल पोलिस स्टेशनला दुकानदार संतोष बडगुजर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!