पोलीस अधीक्षक कार्यालयातच कौटुंबिक वादातून दोन गटात हाणामारी
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
जळगाव, प्रतिनिधी: पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला दक्षता समिती तारखेवर आलेल्या पत्नीच्या माहेरच्यांना पतीच्या नातेवाईकांनी कौटुंबिक कलहातून दोन गटात हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली.
याबाबत जखमींकडून दिलेल्या माहितीनुसार, वाकोद ता. जामनेर येथील माहेर असलेले बरखा गोसावी यांना पती गणेश गिरी गोसावी त्रास देत असल्याने त्या माहेरी होत्या. तडजोड करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला दक्षता समितीच्या कार्यालयात पोलिसांनी बरखा हिच्या माहेर व सासरच्यांना बोलावले होते. येथे बरखा यांचे पती गणेश, सासू चंद्रा गोसावी, मावससासू निर्मला गोसावी, शिवा गोसावी, गजू गोसावी आणि अन्य मंडळी पैठण जी. औरंगाबाद व भोकरदन जी. जालना येथून आले होते. चर्चा सुरु असताना अचानक गणेशगिरी व त्यांच्या नातेवाईकांनी खिशातून फायटर काढत चक्क पोलीस अधीक्षक कार्यालयातच गुंडगिरी करीत संतोषगिरी व मनोज यांच्या डोक्यात फायटर मारले. तसेच इतर महिलांनी देखील दगड, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. थोड्याच वेळात पोलिसांनी धाव घेत वाद मिटवला. परंतू या हाणामारीत तीन जण रक्तबंबाळ झालेत. सर्वांवर जिल्हा रुगणालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, सासरच्या मंडळीने आमच्या हल्ला केल्याचा आरोप पिडीत तरुणीने केला आहे.