भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्ययावलसामाजिक

फैजपूर शहरातील नाले सफाई एक दिखावा, कर्मचारीच हाकताहेत पालिकेचा गाळा…

फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | पावसाळ्यात शहरात खोल भागात पाणी साचू नये व नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहचू नये म्हणून पावसाळ्याच्या आधी दरवर्षी फैजपूर नगरपालिके कडून नाले सफाई केली जाते.

त्या नुसार गेल्या एक दोन दिवसापासून फैजपूर शहरातील नालेसफाईला सुरुवात करण्यात आली असून नालेसफाई केवळ देखावा केला जात असून शहरातील त्रिवेणी वाडा ते सुभाष चौक पर्यंत, सरदार वल्लभभाई कॉम्प्लेक्स, आठवडे बाजार, म्युनिसिपल हायस्कूल परिसर, नालेसफाई सुरू आहे.

सर्व कामे राम भरोसे..
तीन चार दिवस थातुर मातुर नालेसफाई करून संबंधित ठेकेदर नगरपालिकेकडून अडीच ते तीन लाख रुपयाचे बिल झटपट वसूल करून विल्हेवाट लावली जाईल. नगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या या नाले सफाई ठिकाणी नगरपालिकेचा कोणीही कर्मचारी देखरेखी साठी हजर राहत नसल्याने आचार्य व्यक्त केले जात आहे.

कायम स्वरुपी मुख्याधिकारी नाही
फैजपुर नगरपालिकेला गेल्या तीन वर्षापासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळत नसल्यामुळे नगरपालिकेचा कारभार राम भरोसे चाललेला असल्याचे चित्र आहे.

नालेसफाई सह अनेक नगरपालिकेच्या विकास कामांसह अनेक कामे या ठिकाणी मनमानी कारभाराने सुरू आहे. अशा मनमानी कारभारात मुख्याधिकारी यांच्या अनुपस्थितीत अनेक बिलांची ठेकेदार वसुली करीत असल्याचीही चर्चा आहे.

गेल्या ३ वर्षाच्या कार्यकाळात अतिरिक्त पदभार स्वीकारणारे मुख्य अधिकारी अशा मनमानी कारभारामुळे कंटाळून गेले असून पुन्हा पुन्हा तेच तेच मुख्याधिकाऱ्यांच्या अतिरिक्त कारभारामुळे येथील नगरपालिकेचे कर्मचारी केवळ सह्या घेण्यासाठी त्या ठिकाणी जातात परंतु कोणताही अतिरिक्त नेमणुकीस असलेले मुख्य अधिकारी फैजपूर शहरात नगरपालिकेत हजर राहण्यास नकार देत असल्याचेही सांगितले जाते.

झालेल्या कामांची चौकशी करावी                                                                            केवळ सह्या करण्याचे काम सुरू असून फैजपूर शहरातील नालेसफाई सह अनेक विकास कामे केवळ वाऱ्यावर सुरू आहे शहरातील नालेसफाईचा केवळ दिखावा सुरू आहे आणि जे नालेसफाई सुरू आहे त्याच्या केर कचरा नगरपालिकेच्या घनकचऱ्या ठिकाणी न टाकता इतर ठिकाणी फेकला जात आहे. त्यामुळे नगरपालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. या नालेसफाईची व इतर कारभाराची चौकशी करावी व अशा भोंगळ कारभाराचे बिल अदा करू नये अशी मागणी करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!