भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

सामाजिक

राजे शिवरूद्र प्रतिष्ठान तर्फे सुतोंडा किल्ल्याची सफाई मोहीम मावळ्यांकडून संपन्न !

सुतोंडा, मंडे टू मंडे वृत्तसेवा : सोयगाव येथील सुतोंडा किल्ला येथे राजे शिवरूद्र सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व देवगिरी प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवजयंती निमित्त किल्ले सुतोंडा वर दुर्गसंवर्धन सफाईसाठी शेकडो मावळ्यांकडून मोहीम राबवण्यात आली.

ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज नगर येथील किल्ले सुतोंडा वर राजे शिवरूद्र सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व देवगिरी प्रतिष्ठान यांच्या वतीने दुर्गसंवर्धन मोहीम राबविण्यात आली यावेळी किल्ल्यावर जाणाऱ्या संपूर्ण रस्त्यातले मोठ मोठे दगड, झुडपे काढून वाट सुरळीत करण्यात आली तसेच गरजेच्या ठिकाणी खडकात पाहीऱ्या बनविण्यात आल्या. किल्ल्याच्या महादरवाजात पावसामुळे भग्न झालेल्या पायऱ्यांना दगड मातीच्या मदतीने पुन्हा बनविण्यात आले तसेच दरवाजात पडलेली सगळी दगड काढून मार्ग मोकळा करण्यात आला. किल्ल्याचे ढासळलेले बुरुज दगडांच्या सहाह्यांने पुन्हा रचले गेले तसेच टाके व इतर ऐतिहासिक वास्तूंची साफसफाई व संवर्धन करण्यात आले या वेळ महाराष्ट्रभरातून मावळे उपस्थित होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवव्याख्याते आशिष पगार, हेमंत माळी, विशाल दिघे, निकेत परदेशी, गोपाल देशमुख, स्वप्नील गाडेकर, सूरज पाटील यांच्यासह महाराष्ट्रभरातून ७०- ८० मावळे उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!