आरोग्यरावेर

७ कलमी कार्यक्रमाअंतर्गत सावदा पोलिस स्टेशन परिसरात स्वच्छता अभियान

सावदा, ता. रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या ७ कलमी कार्यक्रमांतर्गत सावदा पोलीस स्टेशनमध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यात सावदा पोलिस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी दर शुक्रवारी सकाळी ७ ते १० वाजेच्या वेळात पोलिस स्टेशन परिसर श्रमदान करून स्वच्छ करीत आहेत.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार सावदा पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी दर शुक्रवारी सकाळी ७ ते १० या वेळेत पोलीस स्टेशन परिसरात श्रमदान करून स्वच्छता करत आहेत. या उपक्रमाद्वारे पोलीस दल सामाजिक बांधिलकीचे उदाहरण उभे करत असून, परिसर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्याचा संदेश देत आहेत.

या मोहिमेअंतर्गत पोलीस स्टेशन परिसरातील साफसफाई, कचर्‍याचे व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे सू व्यवस्थित ठेवणे, स्त्री पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय,रंगरंगोटी तसेच हरित परिसर निर्माण करण्यावर भर दिला जात आहे.

आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचीही सामाजिक जबाबदारी आहे. त्यांनी नागरिकांना आपल्या परिसरात स्वच्छता राखण्याचे व स्वच्छ भारत मिशनला सक्रिय पाठबळ देण्याचे आवाहन सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल पाटील यांनी सावदा शहरवासीयांना केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!