Video| मंत्री खडसेंच्या मुलींची छेड काढणारे विशिष्ट पक्षाचे; मुख्यमंत्री फडणवीसांची एकनाथ शिंदे समोर माहिती
मुंबई, मंडे टू मंडे न्यूज नेटवर्क | केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणारे एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी आहेत. ज्यांनी अतिशय वाईट काम केलेले आहे. अशाप्रकारे छेड काढणं, त्रास देणं हे अतिशय चुकीचं आहे. कोणत्याही परिस्थितीत अशा लोकांना माफी देता कामा नये. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई होईल, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. पोलिसांनी एकाला अटक केली आहे. इतरांना देखील अटक होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
मुक्ताईनगरच्या यात्रेच्या ठिकाणी काही टावळखोरांनी नेते एकनाथ खडसे यांची नात आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खडसे यांच्या नातीची छेड काढणारे टावळखोर हे एका विशिष्ट पक्षाचे होते. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आरोपी टवाळखोरांपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. इतरांना देखील लवकरच अटक होईल, असं फडणवीस म्हणाले.