भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, प्रतिहेक्टर १३ हजार ६०० रुपयांची मदत जाहीर

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : नव्या मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकित शेतकऱ्यांसाठी प्रतिहेक्टर १३ हजार ६०० रुपयांची मदत जाहीर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

राज्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलेलं आहे. अनेक भागातील शेतकऱ्यांची पीक ही अतिवृष्टीमुळे पाण्यात गेलेली आहेत. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला होता. राज्यात १५ लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, त्यांना दिलासा देण्यासाठी शिवसेना भाजप सरकारने विशेष बाब म्हणून आतापर्यंत कधीही नुकसान भरपाई मिळाली नाही तेवढी, म्हणजे एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जी मदत दिली जात होती त्याच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय झालाय. तसच दोन हेक्टरची मर्यादा वाढवून आम्ही ती 3 हेक्टर केली आहे. हा एक मोठा निर्णय आम्ही घेतलाय. असे मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले आहे.

एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे ६ हजार ८०० मिळत होती. त्यापेक्षा दुप्पट मदत आम्ही देणार आहोत. म्हणजे प्रतिहेक्टर १३६०० रुपये मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलीय. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. काल नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि आज शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांच्या पुन्हा पिकं उभी करण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!