भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

राज्यात थंडीची लाट, उत्तर महाराष्ट्र गारठला! तापमानात आणखी घट होणार

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l देशभरामध्ये थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. देशातील उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतीय राज्यांसमवेत मैदानी क्षेत्रांमध्येही तापमानात घट नोंदवण्यात येत असून, इथून वाहणाऱ्या शीतलहरींनी देश व्यापण्यास सुरुवात केली आहे. त्या मुळे गारठा कमालीचा वाढल्याचं लक्षात येत आहे. राज्यात असणारा हा थंडीचा कडाका पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

उत्तरेकडील राज्यांमध्ये १४ डिसेंबर पर्यंत थंडीची लाट राहणार असल्याचं हवामान विभागाने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यांमध्ये किमान तापमानाचा पारा ३ ते ४ अंशांनी घट झाली आहे.

राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुन्हा एकदा थंडीची चाहूल लागली आहे . देशात उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढल्याने महाराष्ट्रात चांगलाच गारठा वाढलाय .उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला असून रस्त्यावर ठिकठिकाणी शेकोट्या पेटविल्या जात आहेत . येत्या दोन दिवसात तापमान आत आणखी घट होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे ..

कोरडे थंड वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. परिणामी उत्तर व पश्चिम महाराष्ट्र चांगलाच गारठलाय. त्या मुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये पुढील काही दिवस थंडीची लाट राहणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं.

राज्यात येत्या दोन दिवसात किमान तापमानात कमालीची घसरण होणार असल्याचा हवामान विभागांना सांगितलं . उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात दोन ते चार अंश सेल्सिअसने तापमानात घट होण्याची शक्यता आहे . तर इतर ठिकाणीही हळूहळू तापमान घसरणार असल्याचं हवामान विभागाने वर्तवले .

उत्तर महाराष्ट्र सध्या चांगला गारठलाय . किमान तापमानात कमालीची घट झाली असून मंगळवार १० डिसेंबर रोजी जळगावात नीचांकी ८ अंशांची नोंद करण्यात आली . तर कमाल तापमान रत्नागिरीत सर्वाधिक ३४.५ अंश होते उत्तरेकडील शीत लहरी महाराष्ट्रच्या दिशेन येत असल्याने नाशिकमधे कडाक्याची थंडी पडली आहे. शहरासह ग्रामीण भागातील तपमानात घट झाल्यान नाशिककर गारठले आहे. निफडमध्ये आज ८.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सोमवारच्या तुलनेत पार दोन अंशांनी वाढला असला तरीही गारवा कायम दिसतोय. शेकोटी पेटवून नागरिक ऊब घेत आहेत. रब्बी पिकांना थंडी लाभदायक असली तरी द्राक्ष बागांना फटका बसण्याची शक्यता आहे.


उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळ मुंबईत तापमान घसरले आहे.सोमवारी मुंबईत महाबळेश्वर पेक्षाही कमी तापमानचा पारा होता. सोमवारी १३.७ अंशांवर असलेला तापमानाचा पारा आज वर चढला आहे. पण थंडीचा जोर कमी झाला नाही. पुढील ५ दिवस हे राज्यात थंडीचे असणार आहेत.आज मुंबईत किमान तापमान हे २३ अंशांपर्यंत जाईल. तर कमाल तापमान २८ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!