मोदी सरकारच्या ९ व्या वर्ष पूर्तीनिमित्त सावद्यात महा जनसंपर्क अभियानाचा शुभारंभ
सावदा, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा | भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील श्री नरेंद्र मोदी सरकारला नुकतेच नऊ वर्ष पूर्ण झालीत. या नऊ वर्षात सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळवून दिला आहे. गेल्या नऊ वर्षांमध्ये मोदी सरकारने आणलेल्या विविध योजना, केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे उद्देशाने भारतीय जनता पार्टी संपूर्ण भारतात महा जनसंपर्क अभियान राबवित आहे.
सदरील अभियाना अंतर्गत सावदा शहरात दिनांक ६/७/२०२३ रोजी भाजपा तर्फे नागरिकांशी वैयक्तिक संपर्क साधून महा जनसंपर्क अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यात पहिल्या दिवशी गांधी चौक ते दुर्गा माता मंदिर या रस्त्यावरील सर्व व्यापारी वर्गाशी संपर्क करून मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळेस मोदी सरकारच्या कामांप्रती समर्थन म्हणून ९०९०९०२०२४ या नंबर वर मिस्ड कॉल करण्याचे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी उपनगराध्यक्ष श्याम अकोले, माजी नगरसेविका रंजना भारंबे, माजी नगरसेवक भानुदास भारंबे, बेटी बचाव बेटी पढाव च्या जिल्हा संयोजिका सारिका चव्हाण, शहर उपाध्यक्ष चेतन नेमाडे, नेहा गाजरे, सागर चौधरी, नितीन खारे, अतुल ओवे, अक्षय सरोदे, अमोल पासे, सचिन बऱ्हाटे, महेश भारंबे, अतुल नेमाडे, आकाश भोरटक्के तसेच सरचिटणीस संतोष परदेशी व महेश अकोले उपस्थित होते.