आयुक्त राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक की वसुली पथक, अधिकृत परवानगी घेऊन फिरत होते का पथक?
लाखो रुपयांची वसुली केल्याची चर्चा
सावदा, ता. रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क| नाशिक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे भरारी पथक भुसावल विभागासह जिल्ह्यात फिरून गेले. विभागातील देशी, विदेशी, वाईन शॉप,परमिट रूम बियरबार ला भेटी दिल्या परंतु काय कुठे कारवाई केली? हा प्रश्न गुलदस्त्यात आहे. या बाबत कुठलीही माहिती मिळाली नाही. फैजपूर, सावदा,रावेर,यावल, भुसावळ, मुक्ताईनगर परिसर सह संपूर्ण जिल्ह्यात अनेक दरूच्या दुकानाना भेटी दिल्या.
या संदर्भात अधिक चौकशी केली असता, नाशिक येथून आयुक्तांकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक
एम एच १५ नंबरची नाशिकची गाडी घेऊन संपूर्ण भुसावळ विभागात फिरून गेले. संपूर्ण विभागात रावेर, सावदा, फैजपूर,यावल, भुसावळ मुक्ताईनगर आदी परिसरातील सर्व देशी, विदेशी, वाईन शॉप, परमिट रूम बियरबार ला भेटी दिल्या. मात्र यांनी या दुकानदारांना कारवाईचा बडगा दाखुन मोठमोठ्या रक्कम उकडल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. अशी लाखो रुपये गोळा करून गेल्याचे सांगितले जाते. गेले तीन दिवस नाशिक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक जिल्हा भरात फिरत असल्याची माहिती मिळत आहे. तीन दिवस हे पथक कारवाई करताय की वसुली? या बाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.
या भरारी पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेतली होती काय? मुळात भरारी पथकाला आयुक्तांची परवानगी अथवा संबंधित वरिष्ठांची परवानगी घ्यायलाच हवी. परवानगी शिवाय भरारी पथक फिरू शकते काय? या भरारी पथकाकडे कोणाचीही परवानगी नसल्याची माहिती मिळत आहे. या बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर परवानगी घेतली नसेल तर हे भरारी पथक वरिष्ठांच्या परवानगीशिवाय फिरून कारवाई करू शकते? का हे भरारी पथक बोगस तर नव्हे? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भुसावळ विभागासह जिल्ह्यात देशी, विदेशी, वाईन शॉप, परमिट रूम बियरबार,रेस्टो बार किती आहेत, यांचे कडून हे भरारी पथक मोठ्या प्रमाणावर वसुली करून घेऊन गेले असल्याची चर्चा सर्व प्रकारच्या मद्य विक्रेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. वरिष्ठांना कुठलीही सूचना अथवा माहिती न देता हे भरारी पथक येऊन गेले. भरारी पथक हे कारवाईचा बाळगा उगारून केवळ वसुली करण्यासाठीच आले होते का? या भरारी पथकाची नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांनी वरिष्ठ स्तरावरून चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.