भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरराजकीय

मुक्ताईनगर शासकीय अल्पसंख्यांक तंत्रनिकेतनचे बांधकाम पुर्ण करा – आ. एकनाथ खडसेची मागणी

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी |  मुक्ताईनगर शासकीय अल्पसंख्यांक तंत्रनिकेतन तत्कालीन मंत्री एकनाथराव खडसे यांनी मंजूर करत निधी उपलब्ध केला होता. परंतु, दरम्यानच्या काळात शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध न झाल्याने काम रखडले असून हे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी आ. एकनाथराव खडसे यांनी  विधानपरिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे  केली आहे.

अल्पसंख्यांक समाजातील मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे त्यांना तांत्रिक शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी  मुक्ताईनगर येथे शासकीय तंत्रनिकेतन मंजुर केले होते. त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून निधीची उपलब्धता करून दिली होती. त्यानुसार सप्टेंबर २०१८ पासून सालबर्डी शिवारात शासकीय अल्पसंख्याक तंत्रनिकेतनच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे.

परंतु गेले अनेक दिवसापासून काही तांत्रिक अडचणी व निधी अभावी हे काम थांबले आहे.  त्याबाबतीत आ. एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करून सदर बांधकाम अपुर्ण असल्याचे निदर्शनास आणून दिले.  तसेच या बांधकामास होणाऱ्या विलंबाची कारणे आणि त्यावर काय उपाययोजना केल्या असा प्रश्न उपस्थित केला.  तसेच अपूर्ण कामासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देऊन येत्या शैक्षणिक वर्षापासून तंत्रनिकेतन सुरू करण्यात यावे अशी मागणी केली.

यावर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी उत्तर देताना सांगितले की, मुक्ताईनगर  येथिल अल्पसंख्याक विभागाकडून मंजुर शासकीय तंत्रनिकेतन इमारतीचे बांधकाम सप्टेंबर २०१८ मध्ये सुरू करण्यात आले आहे. इमारतीचा काही भाग व परिसरातील नागरिकांसाठी रस्ता यासाठी जागा उपलब्ध नसल्याने इमारत बांधकामाचा वेग मंदावला आहे.   सदर प्रकरणी जागा उपलब्ध होण्यासाठी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच शासकीय अधिकाऱ्याद्वारे भूसंपादनाची कार्यवाही सुरू आहे असे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!