भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

पंढरपूर येथिल भाविकांसाठीचे आमदार यात्री निवासाचे काम पूर्ण करा– आ. एकनाथराव खडसे

मुंबई, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधि| पंढरपूर येथे भाविकांसाठी बांधण्यात येत असलेले आमदार यात्री निवासाचे बांधकाम निधी अभावी अपूर्णावस्थेत असल्याबाबत एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद मध्ये तारांकित प्रश्न मांडला.

यावेळी आ एकनाथराव खडसे म्हणाले पंढरपूर (जि.सोलापूर) येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या रहिवासासाठी मंदिर परिसरात सर्व पक्षीय आमदारांच्या निधीतून आमदार यात्री निवासाचे बांधकाम आराखड्यास सन २००५ मध्ये मंजुरी मिळाली असून, त्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यानंतर मंदिर समितीच्या सर्व्हे न.५९/१ मध्ये सं २००९ मध्ये आमदार यात्री निवासाचे बांधकाम सुरु होऊनही निधीअभावी गत १३ वर्षांपासून सदर प्रकल्प अपूर्णावस्थेत आहे

असे असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने सदर आमदार यात्री निवासाचे निधी अभावी अपूर्णावस्थेत असलेल्या बांधकामास निधी उपलब्ध करून, सदर यात्री निवासी बांधकाम पूर्ण करण्याबाबत कोणती कार्यावाही केली व भाविक भक्तांच्या सोयीसाठी सदर बांधकाम पूर्ण करण्याची त्यांनी मागणी केली

या प्रश्नाला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उत्तर दिले यावेळी ते म्हणाले सर्व पक्षीय आमदारांच्या निधीतून पंढरपूर येथे दर्शनाला येणाऱ्या भाविक भक्तांना रहिवासा साठी आमदार यात्री निवासाचे बांधकाम आराखड्यास सन २००५ मध्ये मंजुरी मिळाली असून, त्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यानंतर मंदिर समितीच्या सर्व्हे न.५९/१ मध्ये सन २००९ मध्ये आमदार यात्री निवासाचे बांधकाम सुरु करण्यात आले गत १३ वर्षांपासून सदर प्रकल्प अपूर्णावस्थेत आहे

सदर कामास आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत एकूण चार इमारतींच्या बांधकामास दिनांक ११/०७ /२००७ रोजीच्या शासन निर्णयान्वये रुपये ७ कोटी १४ लक्ष रकमेस प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. सदर प्रशासकीय मान्यता आदेशात, उपलब्ध निधीच्या तरतुदीनुसार बांधकाम टप्याटप्याने पूर्ण करणे विषयी नमूद केले आहे. त्यामुळे प्राप्त निधीच्या प्रमाणात अंदाजपत्रक तयार करून त्यास तांत्रिक मान्यता देण्यात आली. त्यानुसार कामे पूर्ण करून, इमारत वापरण्यायोग्य करून हस्तांतरित केलेली आहे. तसेच उर्वरित निधी अद्याप उपलब्ध झालेला नसल्याने, उर्वरित तीन इमारतींचे बांधकाम हाती घेण्यात आले नाही.

सदर चार इमारतींपैकी एका इमारतीचा ताबा मा.विभागीय आयुक्त, पुणे व मा.जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या सूचनेनुसार दिनांक २१/११/२०१३ अन्वये कार्यकारी अधिकारी, श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर यांचेकडे हस्तांतरित केला असून उर्वरित कामे मंदिर समिती मार्फत करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अधिकारी, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर यांचे दिनांक १९/०३/२०१४ नुसार निर्णय देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!