सावदा दूध उत्पादक संस्थेची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न, म्हशीचे दुधाला १२=९० तर गाईचे दुधाला २=५० प्रति लिटर बोनस वाटप
सावदा, ता. रावेर. मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l रावेर तालुक्यातील सावदा येथील सावदा दूध उत्पादक संस्थेची
सर्वसाधारण सभा दिनांक २९ सप्टेंबर रविवार रोजी संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे चेअरमन रविंद्र श्रावण बेंडाळे यांचे अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या वेळी संस्थेच्या हिताचे दृष्टीने ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
संस्थेने म्हशीचे दुधाला १२ रुपये ९० पैसे प्रति लिटर बोनस व गाईचे दुधाला प्रती लिटर २ रुपये ५० पैसे बोनस दूध उत्पादक सभासदांना वाटप करण्यात आला. संस्थेच्या ४६ वर्षांच्या कार्यकाळात इतका बोनस दिला गेला नव्हता. संस्थेच्या गेल्या ४६ वर्षांच्या काळात आज पर्यंत इतका नफा संस्थेला पहिल्यांदा मिळाल्याचे सावदा दूध उत्पादक संस्थेचे सेक्रेटरी दिलीप भीमराज बेंडाळे यांनी सांगितले. आज पर्यंतच्या नफ्याचे रेकॉर्ड या वर्षी तोडण्यात आले. त्या झालेल्या नफ्यामुळे या वर्षी इतक्या मोठ्या प्रमाणावर दूध उत्पादक सभासदांना बोनस दिला गेला. तसेच दूध उत्पादकांमध्ये प्रथम येणाऱ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.म्हशीचे दुधाला पाच बक्षिसे तर गाईचे दुधाला पाच बक्षिसे देण्यात आली.
वार्षिक सर्वसाधारण सभेत सावदा दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन रविंद्र श्रावण बेंडाळे, व्हा.चेअरमन देवानंद नामदेव बढे, संचालक सर्वश्री जगदीश लहू बढे, धनंजय वासुदेव चौधरी, संजय रामचंद्र चौधरी, परिक्षीत शरद वणी, जोस्ना बोंडे.इतर मान्यवर व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.