भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

चिनावल येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये प्रवेश

चिनावल, ता.रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l
रावेर विधानसभा मतदार संघातील रावेर तालुक्यातील चिनावल येथील विजय भंगाळे, विष्णू मधुकर चौधरी, भरत कोळी ,संजय दोधू सरोदे , वर्षा विजय भंगाळे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. रावेर विधानसभा मतदार संघाचे मा महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांचेवर विश्वास ठेवत त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला.

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर भाऊ महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. या वेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष व भाजपा रावेर यावल विधानसभेचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे, शरद महाजन,  गोपाळ नेमाडे , माजी सरपंच योगेश बोरोले, भास्कर सरोदे, जिल्हा दूध संचालक ठकसेन भास्कर पाटील, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष सागर भारंबे, परेश महाजन, संदीप महाजन ,मनीष बोरोले ,जयेश इंगळे, सुमित नारखेडे, योगेश ठोंबरे व आदी सर्व भाजपा कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!