ग्राहकांना झटका : दसरा – दिवाळी पूर्वीच गॅस सिलिंडर महागले
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l येत्या काही दिवसांत दसरा त्या नंतर दिवाळी हे सण येऊ घातले आहेत. त्या पूर्वीच आज १ ऑक्टोबर पासून घरगुती गॅस सिलिंडर च्या दरात कोणतीही वाढ झालेली नसली तरी व्यावसायिक गॅस सिलिंडर च्या दरात मात्र वाढ झाली आहे.
सप्टेंबर महिना संपताच महागाईचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आता व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ४८ रुपयांची वाढ झालेली असून व्यावसायिक गॅस सिलिंडर आता १९०० रुपयांच्या वर गेला आहे. याआधी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातदेखील गॅस सिलिंडरच्या या दरात वाढ झालेली होती.