क्राईमजळगाव

बांधकाम व्यावसायिकाची १ कोटी १५ लाखात फसवणूक, जिवे ठार मारण्याची धमकी

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जुने बांधकाम असलेल्या घराच्या सौदा पावतीनंतर बांधकाम व्यावसायिक सुनील मधुकर चौधरी (५२, रा. धरणगाव, यांचेकडून १ कोटी १५ लाख रुपये घेतले, पण मिळकत खरेदीसाठी टाळाटाळ करून बांधकाम व्यावसायिक सुनील मधुकर चौधरी यांची फसवणूक केली इतकेच नव्हे तर रक्कम परत मागितल्यावर त्यांना जिवेठार मारण्याची धमकीही दिल्या प्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील मधुकर चौधरी (५२, रा. धरणगाव, हे बांधकाम व्यवसायिक असून, जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. जळगाव महानगरपालिकेच्या हद्दीतील सिटी सर्व्हे क्रमांक २११२/६० या जुन्या बांधकाम असलेल्या घराचा व्यवहार ठरवून सौदा पावती करण्यात आली. त्यानुसार चौधरी यांनी संबंधित व्यक्तींना १ कोटी १५ लाख रुपये दिले आणि करारनामा करण्यात आला. करारनाम्यानंतर काही काळाने सदर मिळकत खरेदी करून देण्यास टाळाटाळ सुरू झाली. चौधरी यांनी रक्कम परत मागितल्यावर त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. अनेकदा पाठपुरावा करूनही घराच्या खरेदीची प्रक्रिया झाली नाही आणि दिलेली मोठी रक्कमही परत मिळाली नाही. हा प्रकार १५ मे २०२३ ते ३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत घडला. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी शहर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली.

त्या नुसार मनोज लीलाधर वाणी, कल्पना मनोज वाणी (दोघेही रा. जिल्हा परिषद कॉलनी), शैलेंद्र हेमचंद्र भिरुड, हेमलता उर्फ तनुजा शैलेंद्र भिरुड (दोघेही रा. महाबळ कॉलनी), तिलोत्तमा दीपक इंगळे, दीपक पीतांबर इंगळे (दोघेही रा. मामलदे, ता. चोपडा), संदीप हरिभाऊ पाटील (रा. श्रीकृष्ण कॉलनी), राजेंद्र गोपाळ सावदेकर (रा. आसोदा, ता. जळगाव), शेखर भास्कर भिरुड, शिरीष भास्कर भिरुड, नरेंद्रकुमार दत्तात्रय भिरुड, ज्ञानेश्वर दत्तात्रय भिरुड, गौरव कृष्णा भिरुड (सर्व रा. महाबळ कॉलनी) या १३ जणांवर जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स पो नी शीतलकुमार नाईक करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!