रावेर तालुक्यातील तापी नदी काठ च्या गावांसह जिल्ह्यातील ४१ गावांमधील जलस्त्रोतां मधून दुषीत पाणी पुरवठा
जळगाव/ रावेर, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे म्हणून विशेषत: ग्रामीण भागात दुषीत पाण्यामुळे अतिसाराची लागण व संसर्गजन्य आजारांची लागण होत असल्याने जि.प.च्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतांचे सर्वेक्षण करण्यात येत असते. जळगाव जिल्ह्यात अनेक गावात विशेषत: नदी काठच्या गावांना मिळणारे पाणी दूषित असते. त्यात रावेर तालुक्यातील तापी नदी काठच्या
रायपूर, रनगाव, तासखेडा, गहुखेडा, सुदगाव आदी गावांचा समावेश आहे. जलस्त्रोतांमधून या गावांना पाणी पुरवठा केला जातो. हे पाणी नेहमीच दूषित असल्याने दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य नेहमीच धोक्यात असते. हा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून कायम आहे.
ऑगस्ट २०२४ या महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील ४१ गावांमधील जलस्त्रोतांमधून दुषीत पाणी पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे.
पावसाळ्यात दुषित पाणी पुरवठा होण्याचे प्रकार वाढत असतात. जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तुलनेत काही प्रमाणात दुषीत जलस्त्रोतांच्या संख्येत वाढ झाली आहे. ग्रामीण भागात नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे, अशुध्द पाण्यामुळे अतिसाराची लागण होवू नये यासाठी जि.प.च्या आरोग्य विभागाकडून दर महिन्याला प्राथमिक आरोग्य व उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या गावांचे जलस्त्रोतांचे सर्वेक्षण करून त्यांचे पाणी नमुने जिल्ह्याच्या प्रयोग शाळेला तपासणीसाठी पाठविण्यात येत असतात.
गावांमधील जलस्त्रोतांवरुन दुषित पाणी पुरवठ्यामुळे अनेक आजार पसरतात. त्यामुळे आरोग्य विभागाकडून प्रत्येक महिन्याला जिल्हाभरातील आलेल्या सर्वेक्षणात ४१ गावांमधील जलस्त्रोत दूषित आढळले आहेत. त्यात सर्वाधिक ११ जलस्त्रोत हे जळगाव तालुक्यात दुषित आढळले आहेत.
दूषित जलस्रोत आढळलेल्या गावांत रावेर तालुक्यात रायपूर, रनगाव, तासखेडा, गहुखेडा, सुदगाव, चोरवड, के-हाळे, यावल तालुक्यात मनवेल, मुक्ताईनगर तालुक्यात वायला, पंचाणे, पुरनाड, अमळनेर तालुक्यात कळंबे, एकलहरे, नगाव, कलाली, भुसावळ तालुक्यात निंभोरा, फेकरी, बोदवड तालुक्यात मनुर बु., धोंडखेड, चाळीसगाव तालुक्यात दहिवद, शिदवाडी, खडकी सीम, कुंजर, चोपडा तालुक्यात उत्तमनगर, धरणगाव तालुक्यात शामखेडा, जळगाव तालुक्यात ममुराबाद, घार्डी, बोरनार, डोणगाव, बिलवाडी, पिलखेडा, म्हसावद, लमांजन, कुऱ्हाडी, वाकडी, जळगाव खु, जामनेर तालुक्यात माढणी, पिंपळगाव, हिवरखेडा, चिंचखेडा, पारोळा तालुक्यात वसंतनगर, या गावांचा समावेश आहे.