वादग्रस्त रावेर पंचायत समितीच्या बिडीओ दिपाली कोतवाल यांची बदली
रावेर, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l रावेर पंचायत समितीच्या बिडीओ दिपाली कोतवाल यांची बदली करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ मोठा वादग्रस्त ठरला आहे. रावेर पंचायत समितीतील बीडीओ दिपाली कोतवाल यांच्या बदलीचे आदेश महाराष्ट्र शासनाने रात्री उशीरा काढले असून त्यांची बदली नाशिक जिल्ह्यातील नांदगाव पंचायत समिती येथे करण्यात आली आहे.
रावेर पंचायत समितीच्या बिडीओ दीपाली कोतवाल यांच्या कार्यकाळात ‘व्यक्तीय शौचालय योजना’ मोठी वादग्रस्त ठरली. यात सुमारे दीड कोटीहून अधिक रूपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. हे प्रकरण संपूर्ण राज्यभर चर्चेत ठरले. या भ्रष्टाचार प्रकरणात,कर्मचारी,अधिकाऱ्यांसह ३० च्यावर आरोपी तुरुंगात गेले होते. याच बरोबर बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरण. शेष फंड प्रकरण, ब्युटीपार्लर योजना अशी अनेक प्रकरणे बिडीओ दिपाली कोतवाल यांच्या कार्यकाळात घडल्याने त्यांची कारकीर्द मोठी वादग्रस्त ठरली.