क्राईमजळगावशैक्षणिक

कॉपी मुक्त अभियानाला गालबोट, कॉपी बहाद्दर दोन विद्यार्थी डिबार

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेची सुरुवात झाली आहे. कॉपीमुक्त करण्यासाठी अभियान राबविले जात असून कॉपी रोखण्यासाठी परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला जात आहे. भरारी पथकासह अनेक यंत्रणा राबविल्या जात असताना जळगाव जिल्ह्यात परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपी मुक्त अभियानाला गालबोट लागले असून धरणगाव येथील परीक्षा केंद्रावर दोन विद्यार्थी कॉपी करताना आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करून त्यांना डिबार करण्यात आले आहे.

११ फेब्रुवारी पासून १२ ची परीक्षा सुरू झाली आहे. जिल्ह्यात ८१ केंद्रांमधून ४७ हजार ६६७ विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पहिल्याच इंग्रजी पेपरला धरणगाव येथील केंद्र क्रमांक ७९५ वर माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या पथकाला दोन विद्यार्थी कॉपी करताना आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!