चिंताजनक;वन्यप्राण्यांमध्येही कोरोनाचा धोका वाढला,
Monday To Monday NewsNetwork।
मुंबई(वृत्तसंस्था)। केंद्रीय संवर्धन आणि पर्यावरण मंत्रालयाने या संसर्गामुळे सिंहाच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. परंतु मृत्यू कोठे झाला हे पत्रात नमूद केलेले नाही.एकीकडे कोरोनामुळे अनेक लोकांचा मृत्यू होत असताना आता वन्य प्राण्यांमध्ये कोरोना संक्रमणाचा धोका वाढला आहे. मंत्रालयाने सर्व राज्यांना गाईडलाईन्स जारी केले आहेत. वन्यजीवांमध्ये संक्रमणाचा धोका लक्षात घेता व्याघ्र प्रकल्पात वन कर्मचाऱ्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे.एरिया डायरेक्टर पन्ना टायगर रिझर्व उत्तम कुमार शर्मा यांनी सांगितले की, कोरोना कर्फ्यू लागू केल्यामुळे 16 एप्रिलपासून पन्ना व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांच्या येण्यावर पूर्णपणे बंदी आहे.
वाघाच्या निरंतर देखरेखीची व्यवस्था सुरुवातीपासूनच सुरू आहे. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने सर्व राज्यांना गाईडलाईन्स जारी केल्याची माहिती त्यांनी दिली. वन्य प्राण्यांचा धोका टाळण्यासाठी त्यांनी लोकांना आवाहन केले. माकडांना आणि इतर वन्य प्राण्यांना कोणत्याही प्रकारचे खाद्य देऊ नका. त्यांनी सांगितले की, फील्ड कर्मचार्यांना मास्क आणि सॅनिटायझर अनिवार्य आहे. खेड्यांमध्ये वन कर्मचार्यांकडून संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.जगभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना आता प्राण्यांमध्ये ही कोरोनाचा धोका वाढल्याने एक नवीन गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.जगभरात कोरोनामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. पण आता कोरोनामुळे प्राण्यांच्या जीवाला ही धोका निर्माण झाल्याने चिंता आणखी वाढल्या आहेत.