भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यराष्ट्रीय

चिंता वाढली ! महाराष्ट्रासह चार राज्यात कोरोनाचा ट्रिपल म्युटेशन स्ट्रेन!

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई (वृत्तसंस्था )। जितक्या वेगाने व्हायरस पसरत आहे, तितक्याच वेगाने त्याच्या रुपात बदल होत आहे ,भारतात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला डबल म्युटंट सांगितले असून ही लाट पहिल्या लाटेमधील कोरोना व्हायरसचे बदललेले रुप आहे. पण आता एका संशोधनाने वैज्ञानिकांची चिंता वाढवली आहे. देशातील काही राज्यांमध्ये कोरोना व्हायरसचा ट्रिपल म्युटेशन स्ट्रेन समोर आला आहे. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगढचा समावेश आहे. वैज्ञानिकांचे असे मत आहे की, ‘अनेक देशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याचे कारण कोरोनाचे बदलते रुप आहे. ज्यावर काहीवेळा लस परिणामकारक ठरत नाही.’

म्युटेशन म्हणजे नक्की काय?
कोरोनामध्ये बदल होणे यालाच म्युटेशन म्हणतात. हा बदल तेव्हा होतो जेव्हा कोरोनाचा विषाणू शरीरात जातो तेव्हाच बदल होतो. पण जेव्हा कोरोनाचा विषाणू शरीराबाहेर असतो तेव्हा त्याचा बदल होत नाही. त्यामुळेच जेव्हा तो शरीरात जातो तेव्हा त्याच्यामध्ये नवीन बदल घडतात आणि यालाच नवीन व्हंरियंट आणि नवा स्ट्रेन असे म्हटले जाते. झपाट्याने पसरत आहे कोरोनाचा ट्रिपल म्युटेशन
मॅकगिल युनिवर्सिटीच्या महामारी तज्ञ प्रोफेसर मधुकर पई यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा ट्रिपल म्युटेशन स्ट्रेनचा खूप वेगाने फैलाव होत आहे आणि यामुळे लोक खूप लवकर आजारी पडत आहेत. त्यामुळे आपल्याला कोरोना लसीच्या स्वरुपात बदल करत राहिले पाहिजे. भारतासाठी हे एक आव्हानात्मक काम आहे. कोरोना व्हायरसबाबत सर्वात हैराण करणारी गोष्ट ही आहे की, जितक्या वेगाने व्हायरस पसरत आहे, तितक्याच वेगाने त्याच्या रुपात बदल होत आहे. तज्ज्ञांचे मत आहे की, काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसचा डबल म्युटंट रुप भारतामध्ये समोर आलं होत. हा दोन स्ट्रेनपासून तयार झाला होता. त्यानंतर आता तीन कोरोना स्ट्रेन मिळून ट्रिपल म्युटेशन तयार झालं आहे. यामुळे हे ट्रिपल म्युटेशन देशासाठी खूप चिंता वाढवणारे आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!