भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यराष्ट्रीय

महामारीचं भयान वास्तव! बेड मिळेना म्हणून ती देत होती रिक्षात पतीला आपल्या तोंडाने ऑक्सिजन

Monday To Monday NewsNetwork।

आग्रा वृत्तसंस्था । कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने मोठी हानी होत आहे. या लाटेत अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. त्यासोबतच काही कुटुंबच्या कुंटुंब कोरोनाने खाल्ली आहेत. कोरोना वाढत आहे अशा परिस्थितीत रुग्णांसाठी बेड, ऑक्सिजन बेड मिळणं कठीण होऊन बसल्याने दुसरीकडे ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. रुग्णालयांबाहेर अनेक रुग्ण ताटकळत उपचारासाठी वाट बघत आहेत. पण त्यांच्यापर्यंत डॉक्टर वेळेवर पोहोचू शकत नाहीयत. वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावत आहेत. तर काही ठिकाणी ऑक्सिजन बेड न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू होतोय. अशाचप्रकारे एक महिला आपल्या पतील दवाखान्यात घेऊन जाताना ती आपल्या तोंडाने श्वास देत होती. आपल्या पतीला वाचवण्यासाठीचा या महिलेने केविलवाणा प्रयत्न केला. ती आपल्या पतीला रिक्षातून तीन रुग्णालयात भरती करण्यासाठी फिरत असतांना तोंडाने ऑक्सिजन देत होती… महामारीचं हे भयान वास्तव आहे… ही हृदयद्रावक घटना समोर आली

महामारीच्या या भयानक दृश्याने आख्खा देश हादरला आहे. आगऱ्यात ऑक्सिजन बेड वेळेवर न मिळाल्याने 47 वर्षीय रवी सिंघल यांचं निधन झालं आहे. त्यांच्या पत्नी रेनू सिंघल यांनी त्यांना वाचवण्याचा प्रचंड प्रयत्न केला. रेनू आपल्या पतीला रिक्षातून दोन-तीन रुग्णालयांमध्ये दाखल करण्यासाठी घेऊन गेल्या. मात्र, ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने रुग्णालय प्रशासनाने दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यामुळे रेनू आपल्या पतीला रिक्षाने दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जात होत्या. सुरुवातीला रेणू आपल्या पतीला घेऊन श्रीराम हॉस्पिटलला घेऊन गेल्या. त्यानंतर साकेत हॉस्पिटल, केसी नर्सिंग होम येथे घेऊन गेल्या. मात्र, या तीनही ठिकाणी ऑक्सिजन बेड मिळाला नाही, एसएन मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचल्यालर रवि सिंघल यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं. त्यांचे पती रवी यांनी जीव सोडला. रेनू यांनी पतीला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. रवी यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पत्नी रेनूने तोंडाने ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला. पण सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर रवी यांनी मृत घोषित केलं. ज्या घटनेमुळे संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!