कोरोनाचा धोका वाढला, मुंबईत एकाचा मृत्यू
ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |दिवसेंदिवस कोरोनाचा राज्यात धोका सतत वाढत आहे. मुंबईमध्ये कोरोनाचा धोका वाढत आहे. शुक्रवार रोजी कोरोना मुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यात शुक्रवार दी . २३ मे रोजी कोविड-१९ चे तब्बल ४५ नवीन रुग्ण आढळले. त्यातील सर्वाधिक ३५ रुग्ण एकट्या मुंबईत, ४ पुण्यात , २ रायगडमध्ये, २ कोल्हापूरमध्ये आणि ठाणे आणि लातूरमध्ये प्रत्येकी १ नवीन रुग्ण आढळला. महिनाभरात मुंबईमध्ये १७७ कोरोनाचे रुग्ण आढळले. ठाण्यात कोरोनाने २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २१ वर्षीय तरुणाचा आज पहाटे ६ वाजता कोरोनामुळे मृत्यू झाला. हा तरुण मुंब्रा येथील रहिवासी असून, ठाणे जिल्ह्यातील यंदाचा कोरोनाचा हा पहिला बळी ठरला आहे.
या तरुणाला २२ मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली, जी २३ मे रोजी पॉझिटिव्ह आली. मात्र, उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने आज पहाटे त्याने अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
राज्यातील रुग्ण संख्या आता पर्यंत २१० वर पोहोचली असून त्यातील ८१ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत तर त्यातील एकट्या मुंबईतील रुग्ण संख्या १८३ वर पोहोचली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी विशेष बेड आणि विशेष खोल्यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. कोरोनाशी सामना करण्याची तयारी, मुंबई सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ४० बेडचा वॉर्ड उभारण्यात आला आहे.
मुंबई महानगरपालिकेने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, कोविड-१९ रुग्णांवर उपचार आणि मार्गदर्शनासाठी सुविधा महानगरपालिका रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी विशेष बेड आणि विशेष खोल्यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा