भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्रराष्ट्रीय

Covishield लसीच्या तुटवड्यामुळे डोसमधील अंतर वाढले? जाणून घ्या सत्य

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई/वृत्तसंस्था: देशात कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण करण्यात येत आहे. यात केंद्र सरकारकडून कोविशील्ड लस लोकांवर अधिक प्रभावी ठरावी म्हणून त्याच्या दोन डोसांमधील अंतर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले मात्र, लसीचा तुटवडा भागवण्यासाठी असे केल्याचे काही लोकांकडून बोलले जात आहे. मात्र कोविड वर्किंग ग्रुपचे सदस्य डॉ. एन.के अरोरा यांनी हा वैज्ञानिक तथ्याच्या आधारे घेतला गेलेला निर्णय असल्याचे म्हटले आहे.

गुरुवारीच सरकारने कोविशील्डच्या दोन लसींमध्ये 12 ते 16 आठवडे अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी हे अंतर 6 ते 8 आठवडे ठेवण्याचा सल्ला देण्यात आला होता. सरकारने लसींचा तुटवडा भागविण्यासाठी लसीच्या दोन डोसमधील अंतर 3 महिन्यांपेक्षा जास्त वाढविण्यात आले असल्याचे काही लोकांनकडून बोलले जात आहे. यावर एका वृत्त वाहिनीशी बोलताना अरोरा म्हणाले, हा वैज्ञानिक तथ्याच्या आधारे घेतला गेलेला निर्णय आहे, यामुळे लसींचा तुटवडा दूर होण्यास मदत होणार नाही, परंतु ते अधिक फायद्याचे आहे. हा निर्णय एका अभ्यासाच्या आधारे घेण्यात आला आहे. या अभ्यासातून असे आढळून आले की, कोविशील्ड लसीचा दुसरा डोस 12 ते 16 आठवड्यांनी घेतल्यास ते 85% प्रभावी होईल. सध्या ही लस 79% प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे.

ज्यांना आधीच एका महिन्याच्या अंतराने लस दिली त्यांच्यावर या लसीचा कमी परिणाम होईल का? असा प्रश्नवर उत्तर देताना एन.के अरोरा यांनी सांगितले असे नाही. “ज्यांनी एका महिन्यात किंवा दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत दुसरी लस घेतली आहे, त्यांना काळजी करण्याची गरज नाही. त्यांच्या शरीरात अँटीबॉडीजचे चांगल्या तयार होतील. गुरुवारी, कोविड वर्किंग ग्रुपने कोविशील्डच्या लसीतील अंतर 6 ते 8 आठवड्यांऐवजी 12 वरून वाढवण्याची शिफारस केली. या ग्रुपची शिफारस सरकारने काही वेळातच मान्य केली. यासह लसींच्या कमतरतेमुळे हा निर्णय घेतला गेला नाही, असे डॉ. अरोरा म्हणाले. जर आपण लसीमधील अंतर एक महिन्यापर्यंत वाढवले तर काय फरक पडेल? यामुळेे केवळ 4 ते 6 कोटी डोसमध्ये फरक पडेल. म्हणूनच, एका महिन्याच्या विलंबामुळे लसींच्या कमतरतेमुळे दुसऱ्या डोसचा सामना करणे फार कठीण आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!