तंबाखूपासून बनवली कोरोनाची लस, ऐकावे ते नवलच; मानवी चाचणी सुरू होणार !
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। जगभरात कोरोना संसर्गाने थैमान घातले असताना दुसरीकडे लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही लशींची चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे. तर, काहींकडून कोरोनावर लस विकसित करण्याचे प्रयत्न् सुरू आहेत. ब्रिटनमध्ये तंबाखूपासूनच कोरोनाला अटकाव करणारी लस विकसित करण्यात येत आहे. या लशीची लवकरच मानवी चाचणी सुरू होणार आहे.
लंडनमधील सिगारेट उत्पादक कंपनी लकी स्ट्राइक सिगरेटचे मुख्य मार्केटिंग अधिकारी किंग्सेल व्हीटन यांनी सांगितले की, कंपनीने अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडे मानवी चाचणीसाठी परवानगी मागितली आहे. मानवी चाचणीसाठी आम्हाला परवानगी मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. प्री-क्लिनिकल चाचणीमध्ये या लशीचे परिणामक सकरात्मक आले असून करोनाला अटकाव करण्यासाठी ही लस प्रभावी ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही लस तंबाखूच्या पानापासून बनवण्यात आली आहे. तंबाखूच्या पानातील प्रोटीन काढून त्याला करोना लशीच्या जीनोमसोबत एकत्र करत जेनेटिक इंजिनियरिंग करून ही लस तयार केली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ब्रिटीश अमेरिकन टोबॅको नावाच्या कंपनीची अनुदानित कंपनी असलेली कँटका बायोप्रोसेसिंग एप्रिल महिन्यातच करोनाला अटकाव करणारी लस विकसित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले होते. आता या लशीची लवकरच मानवी चाचणी होणार आहे.