New Symptoms of Corona। कोरोनाची नवी लक्षणे, तरुणांमध्ये आढळली ‘ही’ नवी लक्षणं !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवी दिल्ली : वृत्तसंस्था। आता कोरोनाची लक्षणंही बदलली असल्याचं माहिती समोर येत असून राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेनं म्हटलं आहे, की कोरोनाच्या अर्ध्या रुग्णांमध्ये यावेळी अशी लक्षणं आढळली आहेत, जी याआधी दिसली नव्हती. यात तोंड कोरडं पडणं हे प्रमुख लक्षण आहे. याला जेरोस्टोमिया असंही म्हटलं जातं. लागण झाल्यानंतर सुरुवातील हे लक्षण जाणवत असल्याचं म्हटलं जात आहे. यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये रुग्णामध्ये ताप, घसा दुखणे अशी लक्षणं दिसू लागतात.
या लाटेत वृद्धांपेक्षा तरुणांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होताना आढळून आले आहे. त्याचप्रमाणे कोरोनाची लक्षणांध्येही बदल होताना दिसत आहे. वृद्धांपेक्षा तरुणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येत आहे, असे जेनेस्टिंग्ज डायग्नोस्टिकच्या प्रमुखांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे देशातील तरुणांनी आता सर्वात जास्त काळजी घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. देशातील तरुणांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असताना त्यांना जाणवणाऱ्या लक्षणांमध्येही काही बदल झालेले दिसून आला आहे. बऱ्याच तरुणांमध्ये तोंड कोरडे होणे, पोटाच्या समस्या जाणवणे, मळमळ होणे, बराच काळ अशक्तपणा जाणवणे ही लक्षणे दिसून येत आहेत. तर डोळे लाल होणे आणि डोके दुखणे ही प्रमुख लक्षणे दिसून येत आहेत. आधी कोरोनाच्या लक्षणांमध्ये ताण येत होता. मात्र आता तापाची कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. मात्र इतर लक्षणे आढळून आल्यामुळे अनेक तरुणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येत आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तोंड कोरडं पडण्याचं एक मोठं कारण हेदेखील आहे, की शरीरामध्ये लाळ निर्माण करण्याची क्षमता कमी होते. लाळीमुळेच आपलं तोंड खराब किटाणू आणि इतर घटकांपासून सुरक्षित राहातं. याशिवाय पचनक्रियेतही याची मदत होते. शास्त्रज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीलाच या लक्षणांवर लक्ष दिल्यास उपचार अधिक सोप्या पद्धतीनं होण्यास मदत होईल. यामुळे विषाणूचा प्रसार रोखण्यासही मदत होईल. एका रिपोर्टनुसार, कोरोनाच्या नव्या लक्षणांमध्ये जीभ कोरडी पडणंदेखील एक लक्षण आहे. हेदेखील लाळ तयार न झाल्यानं होतं. यादरम्यान जीभ पांढरी पडल्यासारखं वाटू शकतं. ज्या रुग्णांमध्ये ही लक्षणं आढळतात त्यांनी जेवण करतानाही त्रास होतो. लाळ नसल्यानं अन्न चावणंही अवघड जातं. याशिवाय बोलतानाही त्रास होतो.