सावदा शहरासाठी कोरोना लसीचा पुरेसासाठा मिळावा– नगरसेविका रंजना भारंबे यांचे खासदारांना निवेदन
मंडे टूमंडे वृत्तसंकलन।
सावदा/मुक्ताईनगर, मंडे टू मंडे वृत्तसेवा। सावदा शहरासाठी व परिसरासाठी कोरोनावरील लसीचा पुरेसासाठा उपलब्ध करून देण्यासाठी सावदा नगरपालिकेच्या शिक्षण सभापती तथा नगरसेविका सौ. रंजना भारंबे व समाजसेवक जितेंद्र भारंबे यांच्याकडून बुधवारी खासदार खडसे याना निवेदन देण्यात आले. त्यावर नागरिकांची गैरसोय होणार नाही असे आश्वासन खासदार यांच्या कडून देण्यात आले.
याबाबत अधिक असे, सावदा शहरात कोविड लसीकरण केंद्र आहे, त्यात सावदा शहर व आजूबाजूच्या ग्रामीण परिसरातील नागरिक कोविड लसीसाठी सावदा ग्रामीण रूग्णालयात लसीकरणासाठी येत असतात मात्र, मुबलक लस उपलब्धतेच्या अभावी नागरिकांना परत येत्या पावली जावे लागते त्यामुळे लसीचा साठा उपलब्ध झाला तर तोही बऱ्याच दिवसांच्या अंतराने येत असतो यामुळें सदरील नागरिकांची गैरसोय होत असल्याचे लक्षात घेऊन लस साठा उपलब्ध होईल तो लससाठा नियमित उपलब्ध व्हावा व सावदा शहर व परीसरातील नागरीकांना हक्काचा लस साठा वेळेवर उपलब्ध व्हावा म्हणून नगरसेविका तथा शिक्षण सभापती रंजना भारंबे व समाजसेवक जितेंद्र भारंबे (जे.के) यांनी खासदार रक्षा खडसे यांना निवेदन देण्यात आले. त्याची तातडीने दखल घेत सावदावासियांना पुरेसा लस साठा उपलब्ध व्हावा म्हणून खासदार खडसे यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या व नागरीकांची गैरसोय होणार नाही असे आश्वासन दिले. त्यामुळे नागरिकांची गैरसोय न होता लस उपलब्ध होणार आहे.