सावदा नगरपरिषदेत कामगार मनुष्यबळ पुरवठा कंत्राटात कोट्यवधीचा भ्रष्टाचार, नगरपालिकेकडूनच समाधानकारक कामाचा दाखला?
सावदा, ता. रावेर. मंडे टू मंडे न्युज चमू | रावेर तालुक्यातील सावदा नगरपरिषदेतील मनुष्यबळ सेवा पुरवठा करण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राटात महिन्याला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला असल्याची खात्री लायक माहिती असून सदरील कंत्राट मध्ये सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रति माणूस महिन्याकाठी वेतनामध्ये ११ हजार ते १२ हजार रुपयांचा असा वार्षिक ४० ते ५० लाख रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात येत आहे. कंत्राट दिल्यापासून याचा हिशोब केला तर ही रक्कम कोटींच्या घरात जाऊ शकते. यामध्ये बरिच जणाची पितळ उघडे पडू शकतात असे पालिका वर्तुळात बोलले जात आहे.
प्रशासकीय काळात सावदा नगरपरिषदेतील मनुष्यबळ सेवा पुरवठा करण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राटात महिन्याला अंदाजे ४ ते ५ लाख रुपयांचा तर वर्षाला ५० ते ६० लाखांचा भ्रष्टाचार झाल्याची खात्री लायक माहिती असून आज पावोत हा प्रकार सुरूच असल्याची माहिती ” मंडे टू मंडे न्युज ” ला मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सदरील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी नगरपालिका प्रशासनाला पत्र व्यवहार करून किमान वेतन मिळावे व इपीएफ, ईएसआय वगैरे नियमित भरावे. तसेच बऱ्याच महिन्याचा पगार मिळावा या बाबत मागणी केल्याची माहिती असून या बाबत कुठलीही पूर्तता झालेली नसल्याचीही माहिती आहे.
यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे कामगारांनी वेळोवेळी नगरपालिका प्रशासनाला पत्रव्यवहार करूननही नगरपालिकेकडून मात्र कामगारांची मनुष्यबळ सेवा पुरविणाऱ्या संस्थेला अर्धकुशल, कुशल ३० कामगारांची सेवा पुरवठा करण्याचे काम सस्थेने समाधान कारक असल्याचा दाखला देण्यात आला असल्याची माहिती असून इथेच पाणी मुरत तर नाही ना? अशी चर्चा परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे
पगाराचा हा पैसा नगरपालिका कंत्राटदाराला देते मात्र कंत्राटदार कामगारांना देत नाहीत. मात्र या बाबत कामगारांकडून मागणी केली जात असून सुद्धा त्यांच्या अर्जाची दखल न घेता कामगार पुरवठा संस्थेला मात्र
संस्थेचे काम समाधान कारक असल्याचा दाखला देण्यात येतो.
नगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना त्यांचे कायदेशीर हक्क व वेतन वेळच्या वेळी किमान सात तारखेच्या आत मिळणे आवश्यक असताना कामगारांचे शोषण केले जात आहे. यात मोठा भ्रष्टाचार आहे. या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी. ही चौकशी जर झाली तर गेल्या कंत्राट दिल्या पासून आतापर्यंत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार बाहेर येणार हे मात्र नक्की.
नगरपालिकेला ३० कामगार पुरवठ्याचे नमुद असताना प्रत्यक्षात किती कामगार आहेत? मात्र ३० कामगारांच्या मागे प्रत्येकी १० ते १२ हजार प्रमाणे वर्ष काठी ४० ते ५० लाख रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याची माहिती आहे. प्रत्यक्षात मात्र पूर्ण पगारावर कामगारांच्या सह्या घेतल्या जातात . पुन्हा इपीएस, इएसआय वैगेरे. असा गेल्या कित्येक वर्षांपासून कंत्राट दिल्या पासून हा प्रकार सुरू असून यात आता पर्यंत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात यावी. यात कोण कोण सामील आहेत? कोणाकोणाचे हात ओले झाले ? हे समोर आल्यास प्रशासक काळातील नगरपालिका प्रशासनातील बरेच मोठ मोठे आकडेवारीची गणिते ? समोर येतील. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे व याची चौकशी होऊन कारवाई व्हावी असे संपूर्ण सावदा शहरासह परिसरातून मागणी होत आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

