खासगी दुकानदारांकडून कोर्ट फी स्टॅम्प तिकिटाची जादा दराने विक्री, नागरिकांकडून अतिरिक्त उकळले जातायेत पैसे !
सावदा, मंडे टू मंडे न्युज चमू | शहरासह रावेर तालुक्यात खासगी दुकानदारांकडून ५, १०, २०,३०,४० अश्या कोर्ट फी स्टॅम्प तिकीटांची जादा दराने विक्री करत नागरिकांची आर्थिक लूट करण्यात येत आहे. या प्रकरणात अनेक तक्रारी नागरिक करत आहे.
कोर्ट फी तिकीट आणि रेव्हेन्यु तिकीटीसह कोर्ट फी स्टॅम्प विक्रीसाठी मुद्रांक शुल्क विभागातून अधिकृत विक्रेता नेमण्यात येते, त्याशिवाय इतरांना या तिकीटांचा किंवा स्टँम्पची विक्री करने बेकायदा आहे. न्यायालयात वॉरंट रद्द करणे, जामीन, गैरहजेरी अर्ज, जातमुचलक्याचा अर्ज, माहिती अधिकाराचा अर्ज, निबंधक कार्यालय आदी कामांसाठी कोर्ट फी तिकीट लावणे बंधनकारक असते. याचा पुरवठा जिल्हा कोषागार कार्यालयातून करण्यात येतो.
मुद्रांक शुल्क विभागाने ठरवून दिलेल्या रकमेतच सदरील तिकिटे विकण्याचे बंधनकारक असताना देखील ५ रुपये, १० रुपये व २० रुपये, ३० रुपये, ४० रुपये अश्या सर्व कोर्ट फी तिकिटामागे नागरिकांकडून अतिरिक्त पैसे उकळण्याचे प्रकार रावेर तालुक्यासह सावदा शहरात खासगी दुकानदारांकडून चालू आहे. हाच प्रकार सावदा शहरासह रावेर व रावेर तालुक्यात तसेच यावल सह यावल तालुक्यात,, फैजपूर येथे सर्रास सुरू आहे.
जर हे दुकानदार स्टॅम्प वेंडर नाही तर यांच्या कडे तिकिटे आली कोठून ? कोण यांना तिकिटे पुरवतोय ? या लुटारू दुकानदारावर कडक कारवाई होणार का ? व नागरिकांची लूट थांबनार का ? या काळाबाजारा मागे एखादा रैकेट तर काम करत नाही ना ? याची चोकशी होऊन नागरिकांची आर्थिक लूट थांबावी अशी मागणी होत आहे .