भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

जळगावचे तत्कालीन पोलिस अधीक्षक यांना न्यायालयाचे समन्स

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एका पोलिस निरीक्षकाला बेकायदेशीर निलंबित करून बदनामी केल्याप्रकरणी जळगावचे तत्कालीन पोलिस अधीक्षक एस.जयकुमार यांना न्यायालयात हजर रहाण्याचे समन्स गुरुवारी न्यायाधीश कविता शिरभाते यांनी समन्स काढले. समाजात व पोलिस प्रशासनात बदनामी झाली म्हणून जयकुमार यांच्यावर कडक शासन व्हावे, असा अर्ज सादरे यांच्यातर्फे न्यायालयात दिला आहे.

जळगाव जिल्ह्यातील बाेदवड पोलिस स्टेशनचे पाेलिस निरीक्षक अशाेक सादरे हे बाेदवड पोलिस स्टेशनला असताना नोव्हेंबर २०१३ रोजी जयकुमार यांनी त्यांना निलंबित केले होते. या निलंबना विरोधात सादरे यांनी महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणामध्ये (मॅट) याचिका दाखल केली होती. मॅटमध्ये झालेल्या सुनावणीअंती सादरे यांना पुन्हा सेवेत घ्यावे, असे आदेश देण्यात आले.

पोलिस महानिरीक्षकाना पोलिस निरीक्षक पदाच्या अधिकाऱ्याला निलंबनाचे अधिकार आहेत, परंतु पोलिस अधीक्षकाना पाेलिस निरीक्षकास निलंबनाचे अधिकार नाहीत.असे असताना तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी  बाेदवड पोलिस स्टेशनचे पाेलिस निरीक्षक अशाेक सादरे याना निलंबित केले.  असे मॅटने स्पष्ट केले होते. त्यामुळे २१ फेब्रुवारी २०१४ रोजी सादरे यांना पुन्हा सेवेत घेतले होते. यात आपली बदनामी झाली, चारित्र्य हणण झाले म्हणून जयकुमार यांनी दोन कोटी नुकसान भरपाई द्यावी, यासाठी २७ मार्च रोजी सादरे यांनी ऍड. विजय दाणेज यांच्यातर्फे न्यायालयात अर्ज केला. त्यावर बुधवारी सुनावणी झाली. आता जयकुमार यांनी आपले म्हणणे सादर करण्यासाठी २९ तारखेला हजर रहावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

नक्की काय आहे प्रकरण?
सादरेहे बोदवड पोलिस ठाण्यात निरीक्षक पदावर असताना त्यांची वागणूक चुकीची होती. कामकाजात दोष आढळून आले होते, असा चौकशी अहवाल जयकुमार यांनी तयार करून तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक धनंजय कमलाकर यांच्याकडे पाठवला होता. त्यानंतर नोव्हेंबर रोजी जयकुमार यांनीच सादरेंच्या निलंबनाचे आदेश काढले होते. या बाबत आता २९ तारखेला यावर सूनवणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!