भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयताज्या बातम्याराष्ट्रीय

Covid 19 वर बायोकॉननं आणलं नवं औषध, किंमत मात्र !

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना जगातील अनेक शास्त्रज्ञ कोरोनावरील लस आणि औषध शोधण्यात गुंतले आहे. दरम्यान अनेक कोरोनावर अनेक औषध परिणामकारक ठरत आहेत. अशातच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. बायोटेक्नोलॉजी क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या बायोकॉनने इटोलीझुमॅब हे इंजेक्शन बाजारात आणणार असल्याचे जाहीर केले आहे.

बायोकॉनला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून इटोलीझुमॅब इंजेक्शनसाठी मंजुरी मिळाली असून COVID-19 ची सामान्य ते गंभीर लक्षण असणाऱ्या रुग्णांना हे इंजेक्शन उपचारादरम्यान देण्यात येणार आहे. या एका इंजेक्शनची किंमत आठ हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

बायोकॉनकडून असे सांगण्यात आले आहे की, जगात पहिल्यांदाच इटोलीझुमॅबच्या रुपाने बायोलॉजिक थेरपीला मंजुरी देण्यात आहे. तर इटोलीझुमॅबच्या एका इंजेक्शनची किंमत ७ हजार ९५० रुपये आहे. कोरोना रुग्णांना उपचारा दरम्यान चार इंजेक्शनची गरज भासू शकते. एकूणच या थेरपीची किंमत ३२ हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

बायोकॉनच्या प्रमुख किरण मुझूमदार शॉ यांनी असे सांगितले की, कोरोनावर लस येईपर्यंत आपल्याला प्राण वाचवणाऱ्या औषधांची गरज आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत किंवा पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला आपल्याला लस मिळाली तरी पुन्हा इन्फेक्शन होणार नाही, याची कुठलीही खात्री नाहीय. आपल्याला अपेक्षित आहे, तसेच ती लस काम करेल याची कुठलीही खात्री नाहीय. त्यामुळे आपल्याला तयार राहिले पाहिजे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!