भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

ब्रेकिंग | गो- तस्करांकडून गोरक्षक, बजरंग दल संयोजकाला भर दिवसा गाडीखाली जिवे मारण्याचा प्रयत्न, सावदा परिसरातील तस्करी थांबेना !

सावदा ता. रावेर, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यासह सावदा परिसरात मोठ्या प्रमाणात गो-वंशाची तस्करी सुरु असल्याची बातमी “मंडे टू मंडे न्युज ” बऱ्याच वेळी प्रसारीत केली गोवंश तस्करीची ओरड नेहमी होत आली आहे परंतु याला आळा बसताना दिसत नाही याउलट गुरुवार ३ ऑक्टोबर रोजी अवैध गोवंशाची वाहतूक करणाऱ्या वाहनाकडून गोरक्षक व रावेर तालुका बजरंग दल संयोजकास भर दिवसा गाडीने उडवून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने कायदा व सुव्यवस्था मोठा प्रश्न उपस्थित होते आहे.

नुकताच राज्य सरकारने गाईला “राजमाता – गोमाता” म्हणून घोषित केले. असे असताना रावेर तालुक्यातील सावदा येथे गो- रक्षक व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गो- तस्करांना गो- तस्करी करत असताना पकडले असता गो-तस्करांनी गो रक्षक रावेर तालुका बजरंग दल संयोजक कुलदीप पवार यांच्या अंगावर चार चाकी गाडी न. एम एच १५ सी के ७२६२ या गाडीने दोन वेळेस भर रहदारी असणारा स्वामीनारायण नगर मध्ये वृंदावन सुपर शॉपी समोर घालून मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली असून या घटनेने गो-तस्कराना पोलिसांचा धाक राहिला नसल्याची किंवा कुठं पाणी तर मुरत नाही ना अशी चर्चा संपूर्ण रावेर तालुक्यासह सावदा परिसरात जोर धरत आहे. याप्रकरणात सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून या गाडीत ३ गुरांची वाहतूक करत असल्याची माहिती मिळते.

भर दिवसा रहदारी असणाऱ्या रस्त्यावरून गो-वंशाची तस्करी केली जात असल्याने या प्रकरणाने गो वंश तस्करीवर नियंत्रण ठेवण्यामध्ये सावदा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी अपयशी तर ठरत नाही ना? कारण गो तस्कराची हिंमत मारण्यापर्यत वाढत असल्याने पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर भले मोठे प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!