अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार : पोस्को अन्वये गुन्हा दाखल
यावल, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा : तालुक्यातील एका गावातल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी चार जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस दिनांक २७ एप्रील रोजी गावातील चंदकांत सोनवणे याने मुलीचे अपहरण करुन आसोदा तालुका जिल्हा जळगाव यांने येथील महेन्द्र कोळी नासिक येथे आपल्या नातेवाईकांच्या घरी घेवुन जावुन तिच्यावर लैंगीक अत्याचार केले . अत्याचारीत अल्पवयीन मुलीगी ही दिनांक १ मे रोजी आपल्या घरी परतल्याचे सदरच्या झालेल्या प्रकाराबद्दल त्या मुलीने आपल्या कुटुंबास सांगीतले. यानुसार पोलीसांनी गावातील चंद्रकांत सोनवणे व मुलीला ताब्यात घेतले असता मुलीने दिलेल्या माहीती वरून सदरची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरूध्द बालकांचे लैगीक अत्याचार पासुन सरंक्षण कायदा पोस्को अन्वये गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी चंद्रकांत सोनवणे यास अटक करण्यात आली असून अन्य तिघा संशयीत आरोपींच्या शोधण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.