रोझोदा वृद्ध दांपत्य हत्त्या प्रकरणी संशयित आरोपी कडून गुन्ह्याची कबुली,८६ हजाराचा मुद्देमाल हस्तगत !
रोझोदा ता.रावेर (विवेक चौधरी)। येथील ओंकार पांडुरंग भारंबे वय 80 व सुमान ओंकार भारंबे वय 75 या वृद्ध दाम्पत्याचा तिक्ष्ण हत्याराने त्यांचे गळे चिरुन त्यांचे घरात जिवे ठार मारले त्याअनुषंगाने सावदा पोलीस स्टेशन भाग- ५ गुरन.३५/२०२० भादवि.क.३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयांचे गांभिर्य ओळखुन पोलीस अधीक्षक डॉ. श्री.पंजाबराव उगले, अपर पोली अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके यांनी तात्काळ घटना स्थळाला भेट देवुन गुन्हा उघडकिस आणणे कामी सुचना व मार्गदर्शन केले होते. सदर गुन्हयांचे तपास कामी अपर पोली अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके, SDPO श्री.गजानन राठोड, भुसावळ उपविभाग कार्यभार मुक्ताईनगर उपविभाग,पोलीस निरीक्षक श्री.बापु रोहोम स्थानिक गुन्हे शाखा,जळगाव ,सावदा पोलीस स्टेशन कडील सपोनि श्री.राहुल वाघ,पोलीस उपनिरीक्षक श्री.राजेंद्र पवार पोहेकॉ .पांडुरंग सपकाळे, विनोद पाटील,पोना.रिजवान पिंजारी,देवेंद्र पाटील,सुरेश अढायगे, संजीव चौधरी, मेहरबान तडवी,हेमराज भावसार, जगदिश पाटील,बाळु मराठे, विशाल खैरनार,योगेश सावळे, डॉग स्क्वाड चे पोना.शेषराव राठोड, मनोज पाटील , फॉरेन्सिक युनिट मधील पोना.किरण चौधरी, योगेश वराडे यांचे सह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री.सुधाकर लहारे, स.फौ. राजेंद्र पाटील,विजय पाटील, शरीफोद्दीन काझी,अनिल इंगळे, राजेश मेंढे, संजय हिवरकर,रमेश चौधरी, संतोष मायकल, युनुस शेख, किशोर राठोड, नंदलाल पाटील, अरुण राजपुत, राहुल पाटील, नरेंद्र वारुळे अशांचे पथके वरील गुन्हयाचे तपास कामी पोलीस अधीक्षक डॉ.श्री.पंजाबराव उगले यांनी स्थापन केले होते.
सदर गुन्ह्याचा तपासादरम्यान मा पोलीस अधीक्षक डॉ.श्री.पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाने SDPO श्री.गजानन राठोड, भुसावळ उपविभाग कार्यभार मुक्ताईनगर उपविभाग,पोलीस निरीक्षक श्री.बापु रोहोम स्थानिक गुन्हे शाखा,जळगाव ,सावदा पोलीस स्टेशनसावदा पोलीस स्टेशन चे सपोनि श्री.राहुल वाघ यांनी गुन्ह्याचे तपासाच्या अनुषंगाने महत्वाचे २७ मुद्दे ठरवुन त्या मुद्यांवर माहिती घेवुन तपास करण्याबाबत आदेशीत केले होते. त्या २७ मुद्यांमधे मयतांच्या घराबाहेरील ओट्यावर बसणार्या व्यक्तींना बोलावून त्यांची चौकशी करणे हा एक मुद्दा असल्याने ओट्यावर बसणारे 7-8 व्यक्तींची यादी तयार करण्यात आली व त्यांना चौकशी कामी बोलविण्यात आले त्यात एक एक व्यक्तीची विचारपुस करून त्यांना एका बाजूला बसविण्यात आले. त्यावेळी चौकशी करून बाजूला बसविलेल्या व्यक्तींमधे परेश खुशाल भांरबे वय – ३२, हा मयत जेष्ठ नागरिक ओंकार पांडुरंग भारंबे यांचे घरासमोर नेहमी बसत असत व तो इंजिनिअरिंग चा डिप्लोमा चे सेकंड ईयर ला अपियर असुन तो सध्या व्यसनामुळे कर्ज बाजारी झालेला आहे.
याबाबत पोना रिजवान पिंजारी व विशाल खैरनार यांना गोपनीय माहीती मिळाल्याने व त्याची वागणुक व हावभाव संशयीत वाटत असल्याने त्यांनी सदरची माहिती सावदा पोस्टेचे सपोनि राहुल वाघ यांना कळवुन त्याची पुन्हा चौकशी करणेबाबत विचारणा केली त्यावरून सपोनि राहुल वाघ यांनी अपर पोली अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके, SDPO श्री.गजानन राठोड, भुसावळ उपविभाग कार्यभार मुक्ताईनगर उपविभाग,पोलीस निरीक्षक श्री.बापु रोहोम स्थानिक गुन्हे शाखा,जळगाव, यांना सदरची हकीकत सांगुन परेश यास पुन्हा चौकशी कामी बोलावून विचारपुस केली असता त्याचे आधीच्या सांगण्यात व आताच्या सांगण्यात तफावत जाणविल्याने परेश याचे घटनेच्या दिवशी घातलेले कपडे व त्याच्या आई वडीलांना बोलावून त्यांना विचारपूस केली असता त्यांच्या व परेश याच्या सांगण्यात तफावत आढळून आल्याने परेश याचेवरील संशय अधिक बळावल्याने व पोलीस निरीक्षक बापू रोहम सर यांनी त्याच्या शरीराची पाहणी केली असता त्याच्या हातावर जखम झाल्याचे व हजर केलेल्या कपड्यांवर डाग दिसून आल्याने त्यास त्याबाबत विचारले असता केळीचे डाग असल्याचे सांगितले आता परेश हा उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे अधिकार्यांच्या लक्षात आल्याने परेश यास पोलीसी इंगा दाखविताच त्याने सदरचा गुन्हा मीच केला असुन मी व्यसनाधीनतेमुळे कर्जबाजारी झाल्याने मला पैशाची गरज होती त्यामुळे मी चोरी करण्याच्या उद्देशाने दिनांक ०९/०९/२०२० रोजी रात्री ११-३० वा चे सु मयत ओंकार पाडुरंग भारंबे यांच्या घरी जावुन त्यांचा दरवाजा वाजविल्याने मयत सुमन ओंकार भारंबे यांनी दरवाजा उघडला असता त्या मला ओळखत असल्याने मी त्यांना पिण्यासाठी पाणी मागितले त्या पाणी घेण्यास किचनमध्ये गेल्या असता
मी त्यांच्या मागे जाऊन त्यांना बाजूच्या खोलीत ओढत नेऊन त्यांच्या गळ्यावर माझ्या हातातील सुरीने तीन ते चार वार केल्याने त्यांचा जागीच जीव जावुन जमिनीवर पडल्यावर मी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र घेऊन हॉल मध्ये आलो व हॉलमध्ये बसलेले ओंकार पांडुरंग भारंबे यांच्या गळ्यावर माझ्याकडील सुरीने वार करून त्यांना जागीच ठार केले नंतर मी मधल्या खोलीतील कपाटाकडे जाऊन कपाटातील रोख रुपये व बांगड्या घेऊन किचन मधील दरवाजाने बाहेर निघून आमच्या गुरांच्या वाड्यात गेलो त्या ठिकाणी चोरलेला ऐवज लपवून तेथेच झोपलो नंतर सकाळी सकाळी उठून मी मी माझ्या कपड्यावर रक्ताचे डाग असल्याने माझी पॅन्ट टी-शर्ट गुन्ह्यात वापरलेली सुरी व हात रुमाल हॅन्ड ग्लोज असे जुना फेजपुर रोडवर शेता जवळील नाल्यात लपवून घरी निघून गेलो असे सांगून गुन्हा कबुल केल्याने त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यास दिनांक 15/09/2020 पावेतो पोलिस कस्टडी मिळाली असून सदर आरोपी कडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार चोरलेला मुद्देमाल आरोपीचे रक्ताने भरलेले कपडे जप्त करण्यात आले असुन त्याचे वर्णन पुढील प्रमाणे १)५४३४०/- रू रोख
२)३२३८१/- रू कि.चे सोन्याचे व इतर दागीने ३)एक धारदार चाकु. असा एकुण ८६७२१/- रू कि.चा ऐवज तसेच रक्ताने भरलेले कपडे, हातमोजे, व रूमाल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास वरीष्ठांचे मार्गदर्शनानुसार सपोनि श्री.राहुल वाघ करीत आहेत.