भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Uncategorized

धक्कादायक: मी नाही भूताने केली पत्नी व मुलांची  हत्या

पटणा (वृत्तसंस्था)। बिहारनमध्ये एका  बापाने धारदार शस्त्राने बायको आणि ५ मुलांचे पाय कापून त्यांची हत्या केली. ‘माझ्या शरीरात भूत आले आहे आणि त्याने मला सांगितले की, जो समोर येईल त्याला मारून टाक’ असे आरोपी सांगू लागला. या घटनेमुळे परिसरा खळबळ उडाली आहे.

बिहारच्या भगवान पोलीस स्टेशनच्या परिरात असणाऱ्याबलहा  अली मर्दनपुर येथे ही घटना घडली आहे.बलहा  येथे राहणाऱ्या एका निर्दयी बापाने आपली बायको आणि ५ मुलांचे पाय कापून त्यांची हत्या केली. आरोपीला २ मुली आणि ३ मुलगे आहेत. या घटनेत बायको आणि एक मुलगी सोडल्यास बाकी ४ मुलांचा मृत्यू झाला. आरोपीची बायको आणि एक मुलगी या हत्येत गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवधेश चौधरी असं आरोपीचे नाव आहे. बिहारच्या बलहा गावातील तो स्थायिक होता. या घटनेतच्या आधी अवधेश आणि त्याच्या बायकोचे  काही कारणांवरून भांडण झाले होते. हाच राग डोक्यात ठेवून अवधेश ने आपल्या बायकोसह ५ मुलांचे धारदार हत्याराने पाय कापून त्यांची हत्या केली. आरोपी अवधेशने सांगितल्यानुसार, मी घराबाहेर जाताच माझ्या अंगात भूताने प्रवेश केला. त्या भूताने मला समोर येईल त्याला मारून टाक असे सांगितले. त्यानंतर माझ्या घरचे माझ्या समोर आले. भूताने घराच्याचे पाय कापून टाकल. त्यामुळे मी नाही तर भूताने माझ्या बायकोची आणि माझ्या ५ मुलांची हत्या केली, असे तो सांगत होता. पोलिसांनी निर्दयी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली त्यातून आरोपीची मानसिक स्थिती खराब असल्याचे समोर आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!