अभिनेत्री बनवण्याचं आमिष दाखवणाऱ्या सेक्स रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई : अभिनेत्री किंवा मॉडेल होऊ इच्छिणाऱ्या तरुणींना आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायात ढकललं जातं होतं. हे रॅकेट पोलिसांनी सापळा रचून उद्ध्वस्त केलं आहे. अभिनेत्री आणि मॉडेल होऊ इच्छिणाऱ्या तरुणींना चांगली भूमिका देण्याचं आमिष दाखवून जबरदस्ती वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत होता. जाहिरात, वेब सीरिज आणि फिल्ममध्ये काम करणाऱ्या तरुणींना तो टार्गेट करत होता.
मुंबईच्या जुहू येथून पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या हायफाय सेक्स रॅकेटप्रकरणी एका महिलेसह तिघांना गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. जुहू येथून राज्याच्या विविध भागात हायफाय मॉडेल पुरवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार खोटे ग्राहक बसून पोलिसांनी सेक्स रॅकॅटचा पर्दाफाश केला. या सेक्स रॅकेटमध्ये पोलिसांनी 5 लाख 59 हजार 600 रुपयांची रोख रक्कम, 7 लाख 25 हजार रुपयांचे 14 महागडे मोबाईल, 12 लाख रुपयांची लाल रंगाची रेनॉल्ट कंपनीची कार आणि इतर साहित्य असा 24 लाख 84 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. संदीप दशरथ इंगळे, तान्या योगेंद्र शर्मा आणि हनुफा मुजाहिद सरदार ऊर्फ तानिया ऊर्फ तन्वी अशी त्या आरोपींची नावे आहेत. या तिघांनाही भादवीसह पिटा कलमांतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे.
जुहू येथून तिन आरोपी राज्याच्या विविध भागात हायफाय मॉडेल पुरवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तन्वी या आरोपीचा नंबर मिळवला. पोलिसांनी बोगस ग्राहक बसून सेक्स रॅकेटशी संपर्क केला. नऊ ग्राहक असल्याने त्यांच्याकडे नऊ मुलींची मागणी करण्यात आली होती. या मुलींना घेऊन जुहू येथील रामाडा इन पाम ग्रोव हॉटेलमध्ये बोलाविण्यात आले होते. तिथेच एकूण नऊ रुम बुक करण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळी संदीप, तान्या आणि हनुफा हे तिघेही त्यांच्या कारमधून आठ तरुणींना घेऊन आले. बोगस ग्राहक आणि त्यांच्यात आर्थिक व्यवहार सुरु असतानाच सचिन वाझे व त्यांच्या पथकाने या तिघांना अटक केली.सध्या ते तिघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
पोलिसांनी तिघांच्या तावडीतून आठ तरुणींची सुटका केली. चौकशीदरम्यान तरुणींना तिथे वेश्याव्यवसायासाठी आणण्यात आल्याचे उघडकीस आले. या सर्व तरुणींची नंतर वैद्यकीय चाचणी घेण्यात आली होती, वैद्यकीय चाचणीनंतर त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. सेक्स रॅकेटची ही टोळी एस्कॉर्टच्या नावाने सेक्स रॅकेट चालवित होती. त्यासाठी त्यांनी एका वेबसाईटचा वापर केला होती. अटकेनंतर या तिघांनाही बुधवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.