भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

सहकारी महिलेशी अश्लील वर्तन करुन मेसेज करणे भोवले; महाव्यवस्थापकावर गुन्हा !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

महिलेशी अश्लील वर्तन करुन मेसेज करणे एका कंपनीच्या महाव्यवस्थापकाला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन संबंधित महाव्यवस्थापकाच्या विरोधात ओशिवरा पोलिसांनी विनयभंगासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत अद्याप कोणालाही अटक झाली नसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. तक्रारदार महिला ही अंधेरीतील मिल्लत नगर परिसरात राहते. ती एका खाजगी फॅशन टीव्हीमध्ये कामाला आहे. याच कंपनीत आरोपी महाव्यवस्थापक म्हणून काम करतो.

लॉकडाऊनमध्ये तिचे वर्क फ्रॉर्म होम सुरु होते. नोव्हेंबर महिन्यात तिने नियमित कामावर येण्याची तयारी दर्शविली आणि त्यासाठी तिने महाव्यवस्थापक असलेल्या बॉसला फोन करुन माहिती दिली. महाव्यवस्थापकाने तिला जुहू येथील एका हॉटेलमध्ये बोलाविले होते. तिथेच त्याने तिच्याशी अश्लील स्पर्श करुन तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत तिने खडसावल्यानंतर त्याने तिची माफी मागून यापुढे असा प्रकार घडणार नाही अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर ती हैद्राबादला गेली होती आणि यावेळी बॉसच्या सचिवाने तिची समजूत काढून तो कसा चांगला माणूस आहे याबाबत तिला समजविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तिने त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले होते.

या घटनेनंतर तिचा बॉस तिला सतत ‘आय लव्हू यू’ असे मॅसेज पाठवून तिचा मानसिक शोषण करत होता. वारंवार समजूत घालूनही त्याच्यात काहीच फरक पडला नव्हता. त्यामुळे तिने ओशिवरा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी ३५४, ३५४ अ, ३५४ ड, ५०९ भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच कंपनीच्या महाव्यवस्थापकाला या गुन्ह्यांत अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!