भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

डॉक्टर पतीकडून ४ महिन्याच्या मुलीसह पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

बीड (वृत्तसेवा) : ‘तुला मुलीच होतात मुलगा का होत नाही म्हणून डॉक्टर पतीने 4 महिन्याच्या तान्ह्या मुलीसह पत्नीला  रॉकेल ओतून जिवंत पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील सारुळ येथील पीडित मुलीच्या संदर्भात घडली आहे.

केज तालुक्यातील सारोळा येथील प्रियंका ढाकणेचा  कळंब येथील येथील विशाल प्रल्हाद घुगे याच्याशी पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पहिल्यांदा मुलगी झाल्याने प्रियंकाला घरात सासरच्याकडून  मुलासाठी त्रास दिला जात होता. मात्र, पुन्हा एकदा प्रियंका गरोदर राहिल्यानंतर आता तरी मुलगा होईल या अपेक्षेने थोडा त्रास कमी झाला. मात्र, पाच महिन्यांपूर्वी पुन्हा एकदा दुसरी मुलगी झाल्याने तेव्हापासून पती आणि सासरच्या मंडळीकडून तुला मुलं का होत नाही म्हणून मारहाण शिवीगाळ शारीरिक मानसिक त्रास दिला जात असल्याचे पीडित प्रियांकाने सांगितले आहे. रात्री भांडण झालं आणि माझ्या नवऱ्याने मला मारहाण करत माझ्या अंगावर व माझ्या लहान मुलीचा अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काडेपेटी भिजल्याने दुसरी शोधेपर्यंत मी पळ काढला मात्र माझी चार महिन्याची चिमुकली तिथेच आहे. तिला वाचवा’ असा आक्रोश करत प्रियंकाने टाहो फोडला.

पीडितेचा पती विशाल प्रल्हाद घुगे त्याची बहिण आणि मामा हे सर्व मिळून मुलगीच का झाली म्हणून सतत त्रास देत होते. दुसरी मुलगी झाल्याने पतीकडून  नातेवाईकांकडून सतत मानसिक, शारीरिक,आर्थिक त्रास देत आहे. विशाल प्रल्हाद घुगे हा पेशाने डॉक्टर आहे. मात्र, पत्नीला दुसरी मुलगी का झाली म्हणून सतत मारहाण करत होता. रात्री मारहाण करत अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला  आरडाओरडा करतात त्याच्या तावडीतून निसटली रात्री उशिरा कळंब  बसस्थानकात येऊन फोनवरून आई वडिलांना कळवले, नंतर आम्ही कळंब बस स्थानकात धाव घेतली. फक्त मुलीच होतात म्हणून आमच्या जावयाकडून त्रास होत आहे, असं पीडितेची  आई आशाबाई ढाकणेने सांगितलं. या प्रकरणी पीडित प्रियंका घुगेच्या तक्रारीवरून पती डॉ विशाल घुगे विरोधात कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, अद्याप गुन्हा दाखल करण्यात आली नाही.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!