भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

ईडीकडून अनिल देशमुखांची ४ कोटींची संपत्ती जप्त

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

मुंबई, प्रतिनिधी: राज्याच् माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली असून यांची ४ कोटी २० लाखांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. १०० कोटी वसुलीप्रकरणात ईडीने ही पहिली मोठी कारवाई केली आहे. पीएमएलए कायद्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

ईडीने अनिल देशमुखांच्या वरळीमधला एक फ्लॅट आणि पनवेलमधील एका जमिनीवर जप्तीची कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. ईडीने देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. पण देशमुख यांनी प्रकृतीचं कारण देऊन ते चौकशीला हजर राहीले नव्हते. पण ईडीने देशमुखांच्या दोन सचिवांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीच्या आधारे ईडीने देशमुख यांची मालमत्ता जप्त केली आहे.

ईडीने या प्रकरणाचा तपास करत असताना अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरं तसंच कार्यालये अशा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले होते. त्यामुळे येत्या काळात अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी काळात ईडीकडून अनिल देशमुख आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांची चौकशी केली जाऊ शकते. ईडीने देशमुख यांच्या पत्नीला समन्स बजावले होते. पण देशमुखांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याने अद्याप चौकशी झालेली नाही.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!