भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

ऑन द स्पॉट फैसला; गुंडाची दगडाने ठेचून केली हत्या

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नागपूर ८ जानेवारी : उपराजधानी नागपूर शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागपूरकर पुरते हैराण झाले आहे. पण, रविवारी लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि एका गुंडाचा जागेवरच फैसला करत दगडाने ठेचून मारल्याची थरारक घटना घडली असून घटनेने परिसरामध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे.

पोलिसांनी दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास शांतीनगरमधील नारायण पेठ येथे गुंड विजय वाघमारे नागरिकांना त्रास देण्याचे काम केले. सततच्या त्रासाला कंटाळून संतप्त नागरिकांनी मोठ्या संख्येनं एकत्र येत विजयवर हल्ला केला. लोकांचा संताप पाहून त्याचे पंटर लोकंही जागेवरून पळून गेले. त्यानंतर संतापलेल्या लोकांनी दगडाने ठेचून विजयची हत्या केली. विजय वाघमारे हा गुंड आपल्या साथीदारांसह परिसरात हप्ता वसुली करायचा. लोकांना त्रास द्यायला. विजयवर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.  अशाच अनेक तक्रारी त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे.

विशेष म्हणजे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कार्यक्रम हाकेच्या अंतरावर होता. अजित पवारांचा कार्यक्रम संपल्यानंतर ही घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. विजय वाघमारेचा मृत्यू झाल्यामुळे नारायण पेठच्या लोकांनी सुटकेचा श्वास सोडला. पण, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून तणावपूर्ण शांतता आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!